(Image Credit : experiencelife.com)
मुंबई : जांभई येणे ही तशी सामान्य बाब आहे. जनरली आपल्याला हे माहीत असतं की, भूक लागली म्हणजे जांभई येते आणि झोप आली म्हणजे जांभई येते. पण याव्यतिरिक्तही अनेकदा जांभई येते. पण जांभई येण्याचं कारण फार कमी लोकांना माहीत आहे. याचं कारण शरीरात ऑक्सिजन कमी असेल तर मेंदूला तशा सूचना दिल्या जातात आणि आपोआप जांभई येते. मग चारचौघांमध्ये किंवा महत्त्वाच्या मिटींगमध्ये तुम्हाला जांभई येते. अशात त्यावर कशी मात कराल हे जाणून घेण्यासाठी या खास टिप्स...
1) इंटरनॅशनल जर्नल ऑफ अप्लाईड अॅन्ड बेसिक मेडीकल रिसर्चच्या अहवालानुसार, सतत जांभई येत असल्यास विनोदी व्हिडीओ पहावा. कारण हसणं हे जांभईचे प्रमाण कमी करण्याचा प्रभावी उपाय आहे.
2) कोल्ड प्रेस - १-२ मिनिटांसाठी डोक्यावर कोल्ड प्रेस ठेवा. यामुळे काही काळ शरीरात थंडावा राहण्यास मदत होईल.
3) आईस टी किंवा आईस कॉफीदेखील जांभईचे प्रमाण कमी करते. शरीराचे तापमान कमी झाल्यास जांभई कमी येते असा एका संशोधनाचा अहवाल आहे. त्यामुळे थंडगार पेय प्या आणि चारचौघात सतत जांभई देण्याची सवय आटोक्यात ठेवा.
4) दीर्घ श्वास घ्या - शरीरात ऑक्सिजन कमी असेल तर जांभई येण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे तुम्हांला सतत जांभया येत असतील तर दीर्घ श्वास घ्या. नाकातून श्वास आत घ्या आणि तोंडाद्वारा श्वास बाहेर टाका. यामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.
5) एसीमध्ये बसा - तुमच्या आजुबाजूचे वातावरण एसीच्या मदतीने थोडे थंड करा. म्हणजे महत्त्वाच्या मिटींग्समध्ये जांभई येणार नाही, असे देखील काही संशोधनातून समोर आले आहे.