घराघरात मोठ्यांकडून जवस खाण्याचा आग्रह केला जातो. जवसाचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले आहेत. जवस खाल्ल्याने डायबिटिस, वजन वाढणे, उच्च रक्तदाब सारख्या समस्या होत नाहीत. जवस हा सोपा घरगुती उपाय आहे. आजकालची जीवनशैली, बाहेरचे तेलकट, मसालेदार खाणे यामुळे शरिरावर परिणाम होतो. जवस खाल्ल्याने नेमके काय फायदे होतात बघुया
पोषक आहार
जवसाच्या बियांमध्ये पोषक आहाराचे सर्वच गुणधर्म आहेत. प्रोटीन, फायबर, ओमेगा, फॅटी अॅसिड, एंटीऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, मॅग्नीज, सेलेनियम सारखे सर्वच गुणधर्म आहेत. तसेच केसांच्या पोषणासाठीही जवस उपयोगी आहे.
केसांना पोषक
केसांना फाटे फुटले म्हणून अनेक जण त्रस्त असतात. जवस केसांना आतून मुलायम करते. स्प्लिट एंड्स, ब्रेकेज आणि राठ केसांची समस्या दूर होते. केसांना नैसर्गिक सुंदरता येण्यासाठी जवसासारखा नैसर्गिक उपाय दुसरा कोणताच नाही.
कुरळया केसांवर उपाय
कुरळ्या केसांना सांभाळणे सोपे काम नाही. जवसात व्हिटॅमिन ई आणि ओमेगा ३ फॅटी अॅसि़ असते जे केसांना मुलायम बनवते. यामुळे केस कमी तुटतात आणि खराबही होत नाही. दाट केसांसाठीही जवस खाणे फायदेशीर आहे.
हाडांसाठी मजबूत
रोज जवस खाल्ल्याने हाडे व सांधे मजबुत होतात. स्नायुंना बळकटी देण्याचे काम जवस करते.
वजन आटोक्यात राहते
जवसात मुबलक प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते. परिणामी वजन आटोक्यात राहते.