कोरोना व्हायरस आणि फ्लू या दोन्ही समस्या एकचवेळी उद्भवल्यास रुग्णाच्या जीवाला जास्त धोका असतो. 'पब्लिक हेल्थ इंग्लँड' (PHE) च्या रिपोर्टनुसार या दोन्ही इन्फेक्शनमुळे मृत्यूचा धोका दुप्पटीने वाढतो. याशिवाय तज्ज्ञांनी हिवाळ्यात या आजारांचा धोका वाढणार असल्याची सुचना दिली आहे. या रिपोर्टनुसार दोन्ही इन्फेक्शन एकाचवेळी उद्भवल्यास रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाला निरोगी रुग्णाच्या तुलनेत ६ टक्क्यांनी धोका जास्त असतो. ब्रिटनमध्ये याचवर्षी सगळ्यात मोठ लसीकरण केलं जाणार आहे. 'द गार्डियन' ने यासंदर्भातील माहिती दिली आहे.
या लसीकरण मोहिमेअंतर्गत तीन कोटी लोकांना टार्गेट ठेवलं जाणार आहे. यात ६५ वयापेक्षा जास्त वयाचे लोक, गर्भवती महिला, गंभीर आजारांनी पिडीत असलेले लोक यांना प्राथमिकता दिली जाणार आहे. या वयोगटातील लोकांना लस दिल्यानंतरही लसीचे डोस उरल्यास ५० वर्षांवरील वयोगटातील लोकांना लस दिली जाणार आहे. हिवाळ्यात फ्लू किंवा इतर आजारांपासून स्वतःचा बचाव न केल्यास रुग्णसंख्या वाढू शकते.
एखाद्या व्यक्तीला फ्लू आहे की कोरोनाचं संक्रमण याची काळजी घ्यावी लागेल. PHE च्या रिपोर्टनुसार देशात २० जानेवारी ते २५ एप्रिल या कालावधीत एकूण २० हजार रुग्णांची नोंद करण्यात आली होती. अनेकांना रुग्णाला फ्लू आणि कोरोना व्हायरस या दोन्ही समस्या उद्भवल्या होत्या. यातील जास्तीत जास्त रुग्णांची स्थिती गंभीर होती. ४३ टक्के लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला होता. दरम्यान कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्याचं प्रमाण २७ टक्के होतं.
फ्लू एक व्हायरल इन्फेक्शन आहे. जे खोकण्यातून किंवा शिंकण्यातून पसरतं. कोविड १९ सुद्धा असाच पसरतो. फ्लूने संक्रमित असलेला व्यक्ती जवळपास एका आठवड्यानंतर बरा होतो. पण कोविड १९ असलेल्या व्यक्तीला या आजारातून बाहेर येण्यासाठी जास्तवेळ लागू शकतो. दरम्यान या दोन्ही आजारांमुळे ६५ पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांच्या जीवाला धोका असतो. हिवाळ्याच्या वातावरण फ्लू जास्त पसरतो. कोरोनाबाबत सांगता येणं कठीण आहे. पण दोन्ही आजारांची लक्षणं सारखीच आहेत. वैद्यकिय तपासणी केल्याशिवाय यातील फरक ओळखणं कठीण आहे.
ऑक्सफोर्ड, स्पुतनिक नाही तर 'या' कंपनीची कोरोना लस सगळ्यात आधी मिळणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी फायजर कंपनीची कोरोनाची लस चाचणी प्रक्रियेतून यशस्वी होऊन सगळ्यात आधी लोकांसाठी उपलब्ध होईल असे संकेत दिले आहेत. फॉक्स न्यूजशी बोलताना मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, फायजर कंपनीच्या लसीचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. जॉनसन एंड जॉनसनची लस येण्याासाठी विलंब होऊ शकतो असं ही ते यावेळी म्हणाले. आतापर्यंत जगभरातील कोणत्याही देशात लस यशस्वीरित्या तयार झाल्याची घोषणा करण्यात आलेली नाही. सर्वसामान्यासाठी आतापर्यंत लस उपलब्ध झालेली नाही.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीकडून जगाला खूप अपेक्षा आहेत. मधल्या काळात सुरक्षेच्या कारणास्तव या लसीची चाचणी रोखण्यात आली होती. त्यानंतर ब्रिटनमध्ये पुन्हा या लसीची चाचणी सुरू करण्याची परवानगी मिळाली. यादरम्यान फायजर कंपनीच्या लसीचे चांगले परिणाम दिसून आल्याची माहिती समोर आली आहे. याआधीही व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते. की, संकटांचा सामना करत असलेल्या अमेरिकन लोकांसाठी डिसेंबरपर्यंत लस तयार होऊ शकते. सगळ्यात आधी वयस्कर लोक आणि आरोग्य सेवेतील कर्मचारी यांना लस दिली जाणार आहे.
अमेरिकन आरोग्य संस्था सीडीसीनं एक गाईडलाईन जारी केली आहे. सीडीसीनं अमेरिकन राज्यांना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी जानेवारीपर्यंत लसीकरण करण्यासाठी तयार असायला हवं. ही लसीकरण मोहिम मोफत असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे. अमेरिकेचे तज्ज्ञ डॉ. एथंनी फाऊची यांच्यासह अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वर्षाच्या शेवटापर्यंत अमेरिकेत कोरोनाची लस उपलब्ध होऊ शकेल पण याची शक्यता कमी आहे. ट्रम्प हे अमेरिकेत ३ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकांच्या आधी लस लॉन्च करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यावेगाने कोणतीही लस यशस्वी होताना दिसून येत नाहीये.
हे पण वाचा-
दिलासादायक! भारताला कोरोनाची लस कधीपर्यंत मिळणार? भारतीय शास्त्रज्ञांनी सांगितलं की...
पोटाच्या रोजच्या तक्रारी ठरू शकतात IBD समस्येचं कारण; वाचा लक्षणं आणि उपाय
भय इथले संपत नाही! चीनमध्ये नव्या माहामारीचा शिरकाव; आत्तापर्यंत हजारो लोकांना संसर्ग
तुम्हालाही अचानक BP चा त्रास होतो? तज्ज्ञांनी सांगितले 'बीपी' नियंत्रणात ठेवण्याचे सोपे उपाय