शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

तुमच्याही लघवीमधून फेस येतो का? जाणून घ्या कारणं आणि आयुर्वेदिक उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 10:21 AM

Foamy urine causes and symptoms : बऱ्याच लोकांच्या लघवीमध्ये अनेक फेस येतो. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जेव्हा लघवीत फेस दिसतो तेव्हा त्याला क्लाउडी यूरिन असं म्हटलं जातं.

Foamy urine causes and symptoms : लघवीचा रंग सामान्यपणे हलका पिवळा असतो. पण जर लघवीचा रंग गर्द पिवळा येत असेल आणि लघवी करताना त्यातून फेस येत असेल तर मग ही धोक्याची घंटा असू शकते. बऱ्याच लोकांच्या लघवीमध्ये अनेक फेस येतो. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. जेव्हा लघवीत फेस दिसतो तेव्हा त्याला क्लाउडी यूरिन असं म्हटलं जातं.

सामान्यपणे लघवीमध्ये फेस येणे ब्लॅडर भरण्याचा संकेत आहे. या स्थितीत यूरिन तुमच्या ब्लॅडरवर हल्ला करते. पण यामागे आणखीही काही कारणे असू शकतात. चला जाणून घेऊ लघवीतून फेस येण्याचं कारण काय आहे.

सामान्यपणे यूरिनचा स्पीड जास्त असल्याने फेस तयार होतो. पण जर लघवीत फेस जास्तच दिसत असेल आणि दिवसेंदिवस वाढत असेल तर हा एखाद्या गंभीर आजाराचा संकेत असू शकतो. अशात तुमच्या लघवीत फेस दिसत असेल तर याच्या आणखीही काही लक्षणांवर लक्ष देण्याची गरज आहे. 

लघवीतून फेस येण्याची लक्षणं...

- हात, पाय, चेहरा आणि पोटावर सूज, हे किडनी डॅमेज झाल्याचे संकेत असू शकतात.

- थकवा

- भूक कमी लागणे

- मळमळ

- उलटी

- झोपेची समस्या

- लघवी कमी तयार होणे

- जर तुम्ही पुरूष असाल तर ऑर्गॅज्मवेळी सीमन फार कमी किंवा अजिबातच न येणे

- जर तुम्ही पुरूष असाल तर इंफर्टिलिटीची समस्या होणे

लघवीतून फेस येण्याची कारणं

जेव्हा तुम्ही बराच वेळ लघवी रोखून ठेवता आणि मग अचानक पास करता तेव्हा जास्त स्पीड असल्याने लघवीत फेस तयार होतो. पण हा फेस काही वेळातच क्लीअर होतो. अनेकदा लघवीत फेस तयार होण्याला यूरिनमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असण्याकडे इशारा करतं. यूरिनमधील प्रोटीन हवेच्या संपर्कात आल्यावर फेस तयार होतो.

इतर कारणं

किडनी डिजीज

किडनीचं मुख्य काम ब्लडमधील प्रोटीन फिल्टर करणं असतं. प्रोटीन आपल्या शरीरात फ्लूइडला बॅलन्स करण्यात महत्वाची भूमिका बजावतं. किडनी डॅमेज झाल्यावर किंवा किडनीसंबंधी काही आजार झाल्यावर हे प्रोटीन किडनीतून लीक होऊन यूरिनमध्ये मिक्स होतं. एल्बुमिन एकप्रकारचं प्रोटीन असतं जे आपल्या रक्तात असतं. जेव्हा तुमची किडनी योग्यप्रकारे काम करते तेव्हा किडनी या प्रोटीनला जास्त प्रमाणात तुमच्या लघवीत जाऊ देत नाही.  

डिहायड्रेशन

जर कुणाला डिहायड्रेशनची समस्या झाली तर त्यांच्या लघवीचा रंग डार्क दिसतो. असं पाण्याचं सेवन फार कमी प्रमाणात केल्याने होतं. पाण्याचं सेवन कमी केल्याने  प्रोटीन यूरिनमध्ये डायल्यूट होत नाही. प्रोटीनमध्ये अनेक अशा प्रॉपर्टीज असतात ज्यांनी यूरिन पास करताना फेस तयार होतो. जर हायड्रेटेड राहिल्यानंतरही एखाद्या व्यक्तीच्या लघवीत फेस येत असेल तर हे किडनी डिजीजचं लक्षण असू शकतं.

डायबिटीस

शरीरात ब्लड शुगर लेव्हल वाढल्याने किडनीत एल्बुमिन हाय लेव्हलमध्ये पास होतं. ज्यामुळे यूरिनमध्ये फेस दिसतो. टाइप 2 डायबिटीसच्या रूग्णांमध्ये खालील लक्षणे दिसतात.

- धुसर दिसणे

- तोंड कोरडं पडणे

- सतत तहान लागणे

- सतत लघवी लागणे

- भूक लागणे

- त्वचेवर खाज येणे

आयुर्वेदिक उपाय

धण्याचं पाणी

धण्याचं पाणी सेवन केल्याने लघवीसंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. लघवीतून फेस येणे किंवा जास्त वास येणे ही समस्या या पाण्याने दूर होते. या पाण्याच्या सेवनाने यूटीआयची समस्या दूर करण्यास मदत मिळते. धण्याचं पाणी तयार करण्यासाठी एक कप पाण्यात एक चमचा धणे टाकून उकडून घ्या. त्यानंतर पाणी कोमट झाल्यावर गाळून त्याचं सेवन करा. दिवसातून दोन वेळा या पाण्याचं सेवन करावं.

आल्याचं पाणी

आल्याचं पाणी पिऊनही तुम्ही लघवीतील दुर्गंधी आणि फेस दूर करू शकता. यासाठी अर्धा तुकडा आले घ्या आणि एक कप पाण्यात ते उकडा. पाणी कोमट झाल्यावर चहासारखं थोडं थोडं सेवन करा. या पाण्याने ब्लॅडर इन्फेक्शन, लघवीसंबंधी समस्या दूर होतात. 

ब्लूबेरी ज्यूस

लघवीमधून फेस किंवा दुर्गंधी येत असेल तर तुम्ही ब्लूबेरीचा ज्यूस सेवन केला पाहिजे. यूटीआय इन्फेक्शन, लघवीतून वास, ब्लॅडरमधील इन्फेक्शन इत्यादी समस्या या ज्यूसने दूर होतात. एक कप ब्लूबेरी ज्यूस दिवसातून दोन वेळा सेवन करा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य