शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

हिवाळ्यात केसगळती आणि कोंड्यामुळे हैराण आहात? करा हे घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 10:57 AM

Health Tips : हिवाळ्यात केसांची काळजी घेण्यासाठी काही खास गोष्टीही कराव्या. चला जाणून घेऊ थंडीच्या दिवसात केसगळती थांबवण्यासाठी काही खास घरगुती उपाय...

Health Tips : थंडीच्या दिवसात आरोग्य तसेच त्वचेसंबंधी अनेक समस्या होत असतात. थंडी जसजशी वाढत जाईल केसगळतीही अधिक वाढेल. थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना केसगळतीची समस्या होते. अशात केसांची काळजी घेण्यासाठी काही खास गोष्टीही कराव्या. चला जाणून घेऊ थंडीच्या दिवसात केसगळती थांबवण्यासाठी काही खास घरगुती उपाय...

केसगळतीचं कारणं...

हिवाळ्यात जास्तीत जास्त लोक पाणी पिणं कमी करतात. त्याऐवजी गरम चहा किंवा कॉफीचं सेवन अधिक प्रमाणात करतात. त्यामुळे शरीरात बदल होतात आणि केसगळती होऊ लागते. असं नाहीये की, केसगळतीची समस्या या वातावरणात केवळ महिलांनाच होते. पुरूषांचे देखील केस गळतात. त्यांच्या टॉवेलवरही केस दिसू लागतात.

गरम पाणी

थंडीच्या दिवसात सामान्यपणे लोक आंघोळीसाठी गरम पाण्याचाच वापर करतात. पण केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर अजिबात करू नये. जर पाणी जास्तच थंड असेल तर त्यात थोडं गरम पाणी टाकून कोमट करा. जास्त गरम पाण्याने केस धुतल्यास केस कमजोर होतात आणि केसगळती होऊ लागते.

तेल लावणं गरजेचं

केस मजबूत करण्यासाठी आणि योग्य ते पोषण मिळण्यासाठी केसांना तेल लावणं फार गरजेचं आहे. केसांना तेल लावण्याचे दोन फायदे होतात. एक म्हणजे केस मजबूत होतात दुसरा असा की, त्वचा उजळते. त्यामुळेच आठवड्यातून कमीत कमी दोनदा तेलाने केसांची मसाज करा. तेल लावण्याआधी थोडं गरम करा, याने केस मुळातून मजबूत होती.

कापूरही ठरतो फायदेशीर

पूजेसाठी वापरला जाणारा कापूर केसांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फारच फायदेशीर ठरतं. या वातावरणात हेअर ऑयलिंग आणखी फायदेशीर होईल. यासाठी तेलात थोडा कापूर बारीक करून टाका. कापूर लगेच तेलात मिसळेल आणि या तेलाने केसांची मुळं मजबूत होतील. तसेच याने केसांमधील डॅंड्रफही दूर होती.  

भरपूर पाणी प्यावे

पाणी पिणं आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि सौंदर्य खुलवण्यासाठीही गरजेचं असतं. दिवसभरात कमीत कमी बारा ग्लास पाणी आवर्जून प्यावे. हिवाळ्यात तहान कमी लागते म्हणून कमी पाणी पिऊ नये. हवं तर तुम्ही गरम पाणी पिऊ शकता, याने तुम्ही हायड्रेट रहाल आणि शरीरातील चरबी कमी करण्यासही मदत मिळेल. 

डॅंड्रफ दूर करण्याचे उपाय

1) डोक्याच्या त्वचेची कोमट तेलाने मसाज केल्याने डॅंड्रफच्या समस्येपासून सुटका मिळते.

2) खोबऱ्याचं तेल हे केसांसाठी नैसर्गिक मॉइश्चरायजर म्हणून काम करतं आणि याने डोक्याच्या त्वचेसंबंधी समस्याही दूर होतात.

3) कोमट तेलाने डोक्याची मसाज केल्यावर स्टीम दिल्यावरही डॅंड्रफची समस्या दूर होण्यास मदत मिळते.

4) केसात डॅंड्रफ झाले असतील तर रात्री केसांची मालिश करा. सकाळी केसांना आणि डोक्याच्या त्वचेला लिंबाचा रस लावा. 15 मिनिटांनी केस शॅम्पूने धुवावे. यासाठी कोमट पाण्याचा वापर करा.

टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स