जेवणातून आपल्याला अनेक पोषक तत्व मिळतात. जे शरीरासाठी फार गरजेचे असतात. यात प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी12, फायबरची महत्वाची भूमिका असते. पण जेवणानंतर काही चुका केल्यास हे पोषक तत्व मिळणं बंद होतं.डायटिशिअन मानसी सांगते की, जेवण केल्यावर काही चुका अजिबात करू नये. या काही चुकीच्या सवयी आहेत ज्या लगेच बदलायला हव्यात. यातील काही सवयी हेल्दीही वाटू शकतात, पण त्या शरीराला नुकसान पोहोचवतात.
मिठाई किंवा चॉकलेट
जेवण केल्यावर काहीतरी गोड खाण्याची वेगळीच मजा असते. पण यामुळे तुमचं ब्लड ग्लूकोज वेगाने वाढू शकतं. याजागी ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी आणि क्रेविंग बंद करण्यासाठी डार्क चॉकलेटचा एक तुकडा खा किंवा नॅच्युरल स्वीटनर निवडा.
चहा-कॉफी
जेवणानंतर चहा किंवा कॉफीचा एक कप अनेक लोकांना सवयीसारखा असतो. पण चहा किंवा कॉफीमधील टॅनिन अन्नातील पोषक तत्व अॅब्जॉर्ब होण्यात अडथळा निर्माण करतं. याजागी हर्बल टी ची निवड करा.
फळं किंवा ज्यूस
फळं खाणं हेल्दी असतं, पण जेवणानंतर लगेच यांचं सेवन केल्याने डायजेस्टिव सिस्टमवर लोड येऊ शकतो. यामुळे अन्नाचा ग्लायसेमिक लोड वाढतो आणि जेवणानंतर लगेच शुगर वाढते. न्यूट्रिएंट्सचा पूर्ण फायदा उठवण्यासाठी जेवणाच्या आधी किंवा नंतर स्नॅक म्हणून फळं खावेत.
जास्त पाणी पिणं
शरीर हायड्रेट ठेवणं गरजेचं असतं. पण जेवणानंतर लगेच जास्त पाणी प्यायल्याने डायजेस्टिव एंजाइम कमजोर होऊ शकतात. याने पोषक तत्वांचं अवशोषण कमी होतं. हायड्रेट राहण्यासाठी दिवसभर पाणी पित राहिलं पाहिजे.
झोपणे
जेवण केल्यानंतर लगेच काही लोकांना झोप येते. पण जेवल्यावर लगेच झोपल्याने अॅसिड रिफ्लक्स आणि अपचन होऊ शकतं. डायजेशन वाढवण्यासाठी जेवण केल्यावर थोडं चालण्याची सवय लावा.