गव्हाचे पीठ आणि मैद्यात अनेक प्रकारचे फायबर्स आणि न्यूट्रिएंट्स असतात. हे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. बनावट पीठाचा वापर केल्यास आपल्याला त्यातील पोषक तत्वे मिळू शकत नाहीत. याशिवाय असे पीठ शरीरासाठीही नुकसानकारकसुद्धा ठरते. अनेकदा गव्हाच्या पीठात बोरिक पावडर, मैदा, माती मिसळली जाते. गव्हाच्या पीठाला पांढरे बनवण्यासाठी त्यात अनेकदा तांदळाच्या चुऱ्याचाही वापर केला जातो. आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत. ज्या टिप्सचा वापर करून तुम्ही चपातीचे पीठ चांगले आहे की भेसळयुक्त हे ओळखू शकता.
पीठ मळताना असं ओळखा भेसळयुक्त पीठ
चांगल्या पीठाची पारख तुम्ही मळताना करू शकता. जर तुम्ही चांगले पीठ मळत असाल तर ते खूप मऊ असते. तसंच या पीठापासून तयार केलेल्या चपात्या चांगल्या फुगतात.
भेसळयुक्त पीठाला मळण्यासाठी खूप कमी पाणी लागतं. चपात्यांचा रंग जास्त पांढरा असतो. या पीठाची चपाती व्यवस्थित फुग नाही. एखाद्या च्यूइंगमप्रमाणे ही चपाती खेचली जाते.
इतर सोप्या पद्धती
मैदा किंवा गव्हाच्या पीठात लोखंडाचा चुरासुद्धा मिसळला जातो. याची तपासणी करण्यासाठी काचेच्या प्लेटमध्ये काही प्रमाणात मैदा किंवा चपातीचं पीठ घ्या. त्या पीठावर लोहचुंबक फिरवा. जर पीठ चांगले असेल तर चुंबकावर काहीही चिकटणार नाही. पण पीठात भेसळ असेल तर त्यात लोखंडाचा चुरा चिकटलेला दिसून येईल.
तुम्ही वैज्ञानिक पद्धतीनेही पीठाची तपासणी करू शकतां. तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये हाइड्रोक्लोरिक एसिड मिळेल. चपातीच्या पीठाची तपासणी करण्यासाठी एक टेस्ट ट्यूब घ्या आणि त्यात काही प्रमाणात पीठ एकत्र करा. त्यानंतर यात हायड्रोक्लोरिक एसिड घाला. हायड्रोक्लोरिक एसिड घातल्यानंतर जर काही असे पदार्थ दिसून आले जे गाळावे लागतील तर ते पीठ भेसळयुक्त असू शकतं. ....म्हणून बाथरूममध्ये सगळ्यात जास्त हार्ट अटॅक येतात; सर्वाधिक लोक करतात 'या' ३ चूका
एका काचेच्या ग्लासात पाणी घ्या त्यात एक चमचा पीठ घाला. जर पीठात भेसळ असेल तर त्यात असलेले भेसळयुक्त पदार्थ पाण्यावर तरंगू लागतील. असं झालं तर तुम्ही वापरत असलेले पीठ भेसळयुक्त असू शकतं. चण्याचे पीठ चांगले आणि चमकदार दिसण्यासाठी त्यात अनेक रंग मिसळले जातात. मेटानिल येलो हा रंग खाद्य पदार्थांना चमकदार रंग प्रदान करण्यासाठी त्यात मिसळला जातो. हे आरोग्यासाठी खूप नुकसानकारक ठरतं. यामुळे कँन्सर, पॅरालिसससारख्या आजारांचा धोका वाढतो. दुर्लक्ष नको! आता वेगळ्या क्रमाने दिसू लागली कोरोनाची लक्षणे, आधी येतो ताप मग सुरू होते अंगदुखी....
बनावट चण्याचे पीठ ओळखण्यासाठी, एक चमचे चण्याचे पीठ एका टेस्ट ट्यूबमध्ये घाला. नंतर तीन मिली अल्कोहोल घाला आणि मिश्रणाने मिसळा. नंतर हायड्रोक्लोरिक एसिडचे 10 थेंब घाला. जर मिश्रणाचा रंग गुलाबी झाला तर मग समजून घ्या की त्यात मेटानिल येलोची भेसळ झाली आहे.