जर तुमचे मेंदूचे आरोग्य चांगले असेल तर तुम्ही गोष्टी दीर्घकाळ लक्षात ठेवू शकता. काही वेळा वयामुळे स्मरणशक्ती कमकुवत होते, काही प्रकरणांमध्ये ते आजारांमुळे होऊ शकते. चांगल्या स्मरणशक्तीचे अनेक फायदे आहेत आणि स्मरणशक्ती तुम्हाला हुशार बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. कमकुवत स्मरणशक्ती असलेल्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पोषणतज्ञांच्या मते, स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी तुमचा आहार खूप महत्वाचा असतो. आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल सांगत आहोत, जे तुमच्या मेंदूचे आरोग्य सुधारतात.
हिरव्या पालेभाज्याहार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अहवालानुसार हिरव्या पालेभाज्या मेंदूसाठी चांगल्या मानल्या जातात. पालक, कोलार्ड्स आणि ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के, ल्युटीन, फोलेट आणि बीटा-कॅरोटीनसह अनेक पोषक घटक असतात. तुम्ही तुमच्या आहारात यांचा समावेश केला तर ते संज्ञानात्मक घट रोखण्यास मदत करेल. मोसमी फळेदेखील मेंदूसाठी फायदेशीर असतात.
फॅटी फिशफॅटी फिशमध्ये ओमेगा-३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते. अल्झायमरच्या समस्येने त्रस्त लोकांना हे खाल्ल्याने आराम मिळतो. आठवड्यातून किमान दोनदा मासे खाण्याचा प्रयत्न करा. याशिवाय तुम्ही ओमेगा-3 ने समृद्ध असलेल्या गोष्टी जसे की फ्लेक्ससीड, अॅव्होकाडो आणि अक्रोडचे सेवन करू शकता. मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला या गोष्टींचा आहारात समावेश करावा लागेल.
भरपूर बेरी खाजामुनचा हंगाम सुरू असून तो पोषक तत्वांचा खजिना आहे. हे खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की ज्या महिला आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरीचे सेवन करतात त्यांची स्मरणशक्ती जास्त काळ टिकते. बेरी खाल्ल्याने डायबिटीजच्या रुग्णांची साखरेची पातळी नियंत्रणात राहते. याशिवाय अनेक आजारांपासून आराम मिळतो.
चहा आणि कॉफीचे फायदेकॉफी आणि चहामध्ये असलेले कॅफिन काही काळ तुमची एकाग्रता वाढवण्यास मदत करू शकते. 2014 च्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की जे लोक जास्त कॅफीन वापरतात ते मानसिकदृष्ट्या चांगले कार्य करण्यास सक्षम असतात. चहा आणि कॉफीचे शौकीन असलेल्या लोकांसाठी ही आनंदाची बातमी असू शकते. मात्र याचे जास्त प्रमाणात सेवन करणेदेखील हानिकारक असू शकते.
अक्रोड तुमची स्मरणशक्ती वाढवेलस्मरणशक्ती वाढवण्यासाठी अक्रोड खा, असे अनेकदा सांगितले जाते. ही म्हण अगदी खरी आहे. अक्रोड प्रोटीन आणि निरोगी फॅट्सने समृद्ध असतात. जे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करतात. अक्रोडमध्ये अल्फा-लिनोलेनिक अॅसिड (एएलए) नावाचे ओमेगा-३ फॅटी अॅसिड असते. हे हृदय आणि मन दोन्हीसाठी चांगले आहे.