शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
4
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
5
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
6
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
7
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
8
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
9
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
10
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
11
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
12
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
13
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
14
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
15
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
16
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
17
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
18
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
19
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
20
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

Migraine : मायग्रेनची समस्या आणखी वाढवण्यास जबाबदार असतात 'हे' पदार्थ, वेळीच यांच सेवन थांबवा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 5:17 PM

असे काही पदार्थ आहेत जे मायग्रेनला चालना देतात. या पदार्थांपासून दूर राहिल्यास मायग्रेनची समस्या टाळता येऊ शकते.

मायग्रेन (Migraine) ही एक समस्या आहे जी आपल्या खराब जीवनशैली आणि आहारामुळे उद्भवते (Trigger). वास्तविक, आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. मायग्रेनच्या समस्येमध्ये अन्नाचाही मोठा वाटा असतो. मायग्रेन ही एक प्रकारची डोकेदुखी आहे ज्यामध्ये उलट्या होणे, अस्वस्थता, प्रकाश आणि मोठ्या आवाजाची संवेदनशीलता यासारखी लक्षणे दिसतात. कधी कधी हे दुखणे इतके वाढते की सहनशक्तीच्या पलिकडे जाते.

मेडटेकनुसार, हा एक प्रकारचा मेंदू विकार असून जो ३५ ते ४० वयोगटातील लोकांमध्ये वेगाने विकसित होतो. डब्ल्यूएचओच्या मते, हा स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतो जो मुख्यतः हार्मोनल प्रभावामुळे होतो. OnlyMyHealth नुसार, असे काही पदार्थ आहेत जे मायग्रेनला चालना देतात. या पदार्थांपासून दूर राहिल्यास मायग्रेनची समस्या टाळता येऊ शकते.(Foods That Trigger Migraine)

मायग्रेनला चालना देणारे पदार्थ

कॅफिनयुक्त पेये (Caffeinated Beverages)अमेरिकन मायग्रेन फाऊंडेशनच्या मते, कॅफीन मायग्रेन अटॅक टाळण्यास मदत करू शकते. पण जर तुम्ही चहा, कॉफी यासारख्या कॅफिनयुक्त पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करत असाल तर त्यामुळे मायग्रेनची समस्याही वाढू शकते.

आर्टिफिशियल स्वीटनर्स (Artificial Sweeteners)बाजारात अनेक प्रक्रिया केलेले पदार्थ उपलब्ध आहेत ज्यात कृत्रिम गोडवा वापरला जातो. अशा पदार्थांचा आहारात सतत समावेश केल्याने मायग्रेनची समस्या वाढू शकते. (Foods That Trigger Migraine)

चॉकलेट (Chocolate)चॉकलेटमध्ये कॅफिन आणि बीटा-फेनिलेथिलामाइन दोन्ही मोठ्या प्रमाणात आढळते, ज्यामुळे डोकेदुखीची समस्या वाढू शकते.

मोनोसोडियम ग्लुटामेट (Monosodium Glutamate)मोनोसोडियम ग्लुटामेट (MSG) ग्लुटामिक अ‍ॅसिड हे एक सोडियम मीठ आहे ज्याचे जास्त सेवन केल्याने ही समस्या उद्भवू शकते. हे पॅके केलेले पदार्थ, चायनीज पदार्थ, पॅके केलेले सूप इत्यादींमध्ये आढळते.

लोणचे आणि फर्मेटेड फूड्स (Pickles And Fermented Foods)जर तुम्ही लोणचे, फर्मेटेड फूड्स आणि मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले तर त्यामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो.अशा खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात टायरामाइन असू शकते ज्यामुळे मायग्रेन होऊ शकते.

फ्रोजन फूड्स (Frozen Foods)आईस्क्रीम, पॅक केलेले फास्ट फूड इत्यादींचे सेवन केल्याने देखील मायग्रेन होऊ शकतो.

सॉल्टी फूड (Salty food)मीठयुक्त प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.त्यामध्ये उच्च प्रमाणात सोडियम असते, ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि मायग्रेन अटॅक येऊ शकतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स