Piles Harmful Foods : आजकाल जास्तीत जास्त लोकांना पाईल्स म्हणजे मूनळव्याधची समस्या होते. ही समस्या इतकी गंभीर आहे की, तुमचं उठणं-बसणं किंवा टॉयलेटला जाणंही अवघड होतं. वेगवेगळ्या कारणांनी आजकाल ही समस्या होते. ही समस्या खाणं-पिणं आणि लाइफस्टाईलशी संबंधित आहे. जर कही गोष्टींची काळजी घेतली गेली तर पाईल्सची समस्या लगेच दूर होते.अशात आज जाणून घेणार आहोत की, पाईल्स असेल तर कोणते पदार्थ किंवा भाज्या खाऊ नये.
पाईल्स होण्याची कारणे
- पोट बिघडणं
- एकाच स्थितीत सतत बसणे
- जास्त वेळ उभं राहणं
- लठ्ठपणा
- मद्यसेवन
- फायबरची कमतरता
- आनुवांशिक कारण
चहा-कॉफीचं सेवन कमी करा
पाईल्सची समस्या तेव्हा होते जेव्हा एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफीचं सेवन करते. चहा आणि कॉफीमध्ये कॅफीन असतं. ज्याच्या जास्त सेवनाने शरीरातील पाणी कमी होतं आणि मग मलत्याग करण्यासाठी समस्या होते. अशात चहा आणि कॉफीचं सेवन कमी करा.
बेकरी प्रोडक्ट्स टाळा
बेकरीमध्ये तयार प्रोडक्ट्स जसे की, केक, पेस्ट्री, ब्रेड हे पदार्थ पचायला खूप वेळ लागतो. यामुळे पोटाच्या पचन तंत्रावर प्रभाव पडतो आणि शरीराचं मेटाबॉलिज्मही प्रभावित होतं. जर तुम्ही रोज हे पदार्थ खात असाल तर याने तुम्हाला पाईल्स व्हायला काहीच वेळ लागणार नाही.
कोणत्या भाज्या खाऊ नये?
अनेक अशा भाज्या आहेत ज्यांच्या सेवनाने गॅस-अॅसिडिटी, अपचन आणि ढेकर अशा समस्या होतात. यात शिमला मिरची, फ्लॉवर, बटाटे, पत्ताकोबीसारख्या भाज्यांचा समावेश आहे. या भाज्या नेहमीच खाल्ल्या तर पचन तंत्र कमजोर होतं. ज्यामुळे पाईल्सची समस्या होते.
भाजलेले-तळलेले पदार्थ टाळा
जास्त मसालेदार आणि तळलेले-भाजलेले पदार्थ आरोग्यासाठी नुकसानकारक असतात. यामुळे शरीरात फॅट वाढतं, सोबतच ते सहजपणे पचतही नाहीत. या पदार्थांमुळे बद्धकोष्ठतेची समस्या सुरू होते, जी पुढे जाऊ पाईल्सचं रूप घेते. जर या आजारापासून बचाव करायचा असेल तर तळलेले-भाजलेले पदार्थ खाणं टाळा.
लाल किंवा हिरवी मिरची
पाईल्सची समस्या झाल्यावर तिखट अजिबात खाऊ नये. कारण तिखटामुळे पाइल्सच्या जखमा कमी होत नाहीत. इतकेच नाही तर पाईल्सच्या सुकलेल्या जखमा तिखटामुळे पुन्हा सक्रिय होतात. त्यासोबतट चटपटीत, मसालेदार, गरम पदार्थही खाऊ नयेत.
कच्चे फळ खाऊ नये
जोपर्यंत फळं चांगले पिकत नाहीत तोपर्यंत त्यांचं सेवन करू नये. कच्च्या फळांमध्ये पोटाला इरिटेट करणारे कंपाउंड असतात, जे वेदना अधिक वाढवतात. त्यामुळे फळांचं सेवन केवळ तेव्हाच करावं जेव्हा ते चांगले पिकलेले असतात.
काय कराल उपाय?
हावर्ड मेडिकल स्कूलमध्ये मेडिसिनचे सहाय्यक प्राध्यपक डॉ. हॉवर्ड लेविन म्हणाले की, पाईल्स ही समस्या जीवघेणी नाही. पण यावर उपचार आवश्यक आहे. मेडिकलमध्ये पाईल्सवर अनेक उपचार आहेत. पण तुम्ही काही घरगुती उपायांनीही ही वेदनादायी समस्या दूर करू शकता. चला जाणून घेऊ की, हार्वर्ड हेल्थनुसार या करावं.
सिट्स बाथ घ्या
पाईल्समध्ये होत असलेली खाज आणि जळजळ यापासून सुटका मिळवण्यासाठी सिट्स बाथ घ्यावी. त्यासाठी एका टबमध्ये तीन ते चार इंच गरम पाणी घ्या आणि त्यात 10 ते 15 मिनिटांसाठी बसा. हे नियमितपणे करा याने तुम्हाला फायदा होईल.
फायबरचा आहार
पाईल्स किंवा बद्धकोष्ठतेच्या रूग्णांनी आपल्या आहारात फायबरने युक्त भरपूर पदार्थांचा समावेश करावा. याने तुम्हाला विष्ठा पास करण्यास मदत मिळेल, ज्यामुळे पाईल्समधील रक्तस्त्राव आणि सूज कमी करण्यास मदत मिळते.
एक्सरसाईजही आहे गरजेची
डॉक्टरांनी सांगितलं की, पाईल्सचं मुख्य कारण बद्धकोष्ठता असते आणि ही समस्या दूर करण्यासाठी नियमितपणे एक्सरसाईज करा. तुम्हाला वेळ काढून आठवड्यातून कमीत कमी 150 मिनिटे एक्सरसाईज करावी लागेल. तसेच दिवसभर भरपूर पाणीही प्यावं.