Bad Cholesterol : आजकाल बऱ्याच लोकांना शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या होत आहे. याची वेगवेगळी कारणे असतात. पण मुख्यपणे बदलती लाइफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी असतात. एलडीएल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉलमुळे शरीरातील नसा ब्लॉक होतात आणि रक्त हृदयापर्यंत पोहोचत नाही. अशात हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोकचा धोका असतो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत. त्यातीलच काही आम्ही सांगणार आहोत. सकाळी तुम्ही नाश्त्यात काही गोष्टींचा समावेश केला तर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते.
शुद्ध होईल रक्त
बॅड कोलेस्ट्रॉलमुळे रक्त अशुद्ध होतं. रक्ताचा रंगही गडद होतो. एका शोधानुसार, नसा ब्लॉक झाल्याने रक्ताला पुरेसं ऑक्सीजन मिळत नाही. ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे रक्ताचा रंग जास्त गडद होतो.
बदामाचं दूध
सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाण्याचे खूप फायदे मिळतात. हार्वर्डनुसार, रोज भिजवलेले बदाम खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल 5 टक्क्यांनी कमी होतं. ब्रेकफास्टमध्ये दुधात बदाम टाकून सेवन केलं तर रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि विषारी पदार्थ कमी होतात.
ओटमील
या नाश्त्यातून शरीराला भरपूर फायबर मिळतं. फायबर कोलेस्ट्रॉलसोबत चिकटून त्याला विष्ठेच्या माध्यमातून बाहेर काढतं. हृदयाच्या समस्या असलेल्या लोकांनी फायबरचं सेवन केलं पाहिजे.
संत्री
व्हिटॅमिन सी मिळवण्यासाठी संत्री खायला हवेत. यात फायटोस्टेरोल असतं जे लोक डेंसिटी लिपोप्रोटीनला 7.5 ने 12 टक्के कमी करतं. यात फायबरही भरपूर असतं.
एग व्हाइट आणि पालक
सकाळी रिकाम्या पोटी अंड्याचा पांढरा भाग आणि पालकचा नाश्ता करा. भरपूर पोषण देणाऱ्या या नाश्त्याने कोलेस्ट्रॉलचा धोका कमी होतो. तसेच याने हृदयरोगापासूनही बचाव होतो. हे एक हाय प्रोटीन ब्रेकफास्ट आहे ज्याने ताकदही मिळते.व्हे प्रोटीन स्मूदीदुधापासून पनीर बनवताना जे पाणी शिल्लक राहतं. त्यात व्हे प्रोटीन असतं. काही शोधांनुसार, याचे सप्लीमेंट्स घेतल्याने हाय कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते.