कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट झपाट्याने हातपास पसरू लागला आहे. भारतातील दुसऱ्या लाटेला हाच व्हेरिएंट जास्त कारणीभूत ठरला होता. तिसऱ्या लाटेला रोखायचे असेल तर डेल्टाला अटकाव करणे गरजेचे आहे. त्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. लसीकरणानंतरही कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्क घालणे आवश्यक आहे.
नवीन व्हेरिएंट्स अधिक संसर्गजन्य
कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस आणि गॅमा यांसारखे कोरोनाचे नवनवे व्हेरिएंट्सचा संसर्ग अधिक वेगाने होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.हे व्हेरिएंट्स उत्परिवर्तनानंतर अधिक घातक आणि संसर्गजन्य झाले आहेत.नवीन व्हरिएंट्स कोरोनासंसर्गातून निर्माण झालेल्या अँटिबॉडीजलाही नामोहरम करत असल्याचे निदर्शनास आले आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या मते लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना संसर्गाचा धोका कमी असला तरी प्रदेशानुसार हा धोका कमी-अधिक होतो. जिथे लसीकरणाचा वेग कमी आणि कोरोनासंसर्गाचा वेग अधिक आहे तिथे हा धोका जास्त असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.
मास्कने होणार फायदा
- लसीकरणानंतरही कोरोनाचा संसर्ग टाळायचा असेल तर मास्क लावणे आत्यंतिक गरजेचे आहे.
- मास्क लावल्याने ज्यांचे लसीकरण झालेले नाही, अशा लोकांचे संरक्षण होईल.
- १२ ते १८ या वयोगटातील मुलांचे अधिक ठळकपणे रक्षण होईल, कारण सद्य:स्थितीत या वयोगटासाठी लस उपलब्ध नाही.
लसीकरणानंतरही कोरोनाचा धोकाकोरोनाप्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची उदाहरणे आहेत.अशी उदाहरणे कमी असली तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य आहे. पहिल्या डोसनंतरही काहींना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. इंडियन मेडिकल कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) यांनी ६७७ लोकांमध्ये केलेल्या संशोधनात ८६ टक्के लोकांना डेल्टाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.