योग्य वेळी फळाचे सेवन आरोग्यदायी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2016 1:56 PM
फळ हे शरीरासाठी खूपच फायदेचे आहे.
कोणतीही काम वेळेवर करणे हे खूप गरजेचे आहे. वेळ जर चुकला तर त्या कामाला कोणतेच महत्त्व उरत नाही. तसेच फळांचे सुद्धा असून, वेळेवर जर फळाचे सेवन केले नाहीतर त्याचा शरीराला कोणताच उपयोग होत नाही. काही जण दुपारच्या किंवा रात्रीच्या तर काही सकाळी फळ सेवन करणे पसंत करतात. फळ हे शरीरासाठी खूपच फायदेचे आहे. परंतु, त्याचे सेवन कधी करावे त्याची ही खास माहिती आपल्यासाठी. योग्य वेळ : योग्यवेळी फळाचे सेवन केले तर त्याचे पोषणतत्व हे शरीराला मिळतात. कच्च्या फळांमध्ये शुगर व फाइबर कंटेट अधिक असतात. अशा फळांचे सेवन केल्यामुळे शरीरासाठी ते उत्तम असते. पोटात काही नसताना फळाचे सेवन केले तर ते पचन होण्यासाठीही खूप कमी वेळ लागतो. व शरीराला फळातील सर्व पोषकतत्व मिळतात.यावेळेलाही सेवन करता येतात : काही जणांना जेवण केल्यानंतर फळ सेवन करण्याची सवय असते. ज्यांचा हा वेळ परफेक्ट असेल तर त्यांनी जेवणानंतर २ ते ३ तासानंतर फळाचे सेवन करावे. जेवणानंतर लगेच फळ सेवन केल्याने पोट जड झाल्यासारखे वाटायला लागते. रात्रीला फळाचे सेवन करणे हे टाळावे. रात्री फळाचे सेवन म्हणजे हे खूपच अयोग्य आहे.