महिलांना प्रेग्नेंसी दरम्यान बरेच सल्ले इतरांकडून मिळत असतात. कारण गरोदर असताना आईसोबतच बाळाच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. प्रत्येक स्त्री साठी हा काळ अतिशय महत्त्वाचा असतो. या काळात वेगवेगळे हार्मोनल बदल घडत असतात. गर्भाच्या विविध अवयवांची वाढ देखील याच काळात होत असल्याने गरोदर स्त्रिने पहिल्या तीन महिन्यात कटाक्षाने स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
प्रेग्नेंसीच्या काळात काही पदार्थांचे सेवन केल्यास बाळाचे तसेच आईचे आरोग्य उत्तम राहते. अनेक स्त्रियांना प्रेग्नेंसी नंतर अशक्तपणा, कमजोरी आणि बऱ्याच स्त्रियांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला प्रेग्नंसीच्या काळात येणाऱ्या समस्या टाळायच्या असतील या काही पदार्थांचे सेवन करा
१) डाळिंबाचा रस प्रेग्नेंसीच्या काळात डाळींबाचा रस प्यायल्याने होणारया बाळासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे बाळाचा विकास उत्तमरीत्या होतो. प्रेगनेंसीच्या काळात शरीरास पोषण देणाऱ्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश आहारात करावा. गरोदर पणात महिलेनं पपई आहारातून दूर ठेवावी. गरोदर महिलेनं पपई खाल्यास ती पचवण्यासाठी अधिक त्रासदायी ठरू शकते. कारण यातील लॅटेस्क नावाचा पदार्थ गर्भाशय शोषून घेतो. जो आई-बाळाच्या जिवाला धोकादायक असू शकतो.
२) बीटाचा रस बीट या कंदमुळाचे अनेक फायदे शरीराला होतात. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास बीट खाल्ल्याने किंवा बीटाचा रस प्यायल्याने रक्ताची कमी भरून निघते आणि बाळाचे आरोग्या उत्तम राहते.
३) द्राक्षाचा रस द्राक्षांत असणारे पोषक त्तव गर्भवती स्त्रिच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. याचे सेवन केल्याने होणारे बाळाचे शरीर उत्तम राहते. बाळाची वाढ उत्तमरीत्या होते.
४) भेंडीबऱ्याच महिलांना गर्भावस्थेत चक्कर येतात, उलट्या होतात. या समस्यांपासून स्वतःचा बचाव करायचा असल्यास स्त्रियांनी भेंडीच्या भाजीचा समावेश आहारात करायला हवा. कारण याचे सेवन केल्याने उलटी, मळमळ होणे असा त्रास होत नाही.
५) दूध आहारात कॅल्शियम पूरक घटकांचा समावेश असू द्या. रोज ६०० मिली दूध किंवा दुधाचे पदार्थ नियमित घ्या. तसेच कोवळ्या सूर्यप्रकाशात फिरल्यानेदेखील पुरेसे व्हिटामिन डी मिळेल.