सामान्यपणे सगळ्या भारतीय घरांमध्ये जेवण बनवताना तेल, तूप, लोणी, साखर आणि मिठाचा वापर केला जातो. या पदार्थांशिवाय जेवण पूर्णही होत नाही. पण हेही सत्य आहे की, या गोष्टींमुळे आरोग्य हळूहळू खराब होतं. ज्यामुळे आरोग्य बिघडतं. अशात एक्सपर्ट नेहमीच सांगतात की, या गोष्टी टाळल्या पाहिजे.
खाण्या-पिण्याच्या गोष्टींमध्ये जास्त तेल, मीठ आणि साखरेचा वापर केला तर अनेक गंभीर आणि जीवघेण्या समस्या होऊ शकतात. FSSAI चं असं मत आहे की, या गोष्टी शरीरासाठी गरजेच्या आहेतच, पण यांचं प्रमाण कमी असलं पाहिजे. यांच्या जास्त वापराने हाय बीपी, डायबिटीस, कोलेस्ट्रॉल, हार्ट डिजीज, लठ्ठपणा इत्यादी समस्या वाढतात.
FSSAI ने सल्ला दिला की, तुम्ही मीठ, साखर आणि तेलाचा वापर कसा करावा आणि त्याद्वारे आरोग्य कसं चांगलं ठेवू शकता.
मिठाच्या अधिक सेवनाने होतं नुकसान
जास्त मीठ खाल्ल्याने नॉन कम्युनिकेबल डिजीज जसे की, बीपी, स्ट्रोक आणि हार्ट डिजीजचा धोका वाढतो. जर तुम्हाला लगेच आजारी पडायचं नसेल तर मिठाचं सेवन कमी करा.
मीठ कमी कसं खाल?
पॅकेज फूड्सचं सेवन कमी करा आणि नेहमी घरातील पदार्थ खा. लोणचं, चटणी, केचप आणि पापड कमी खावेत. जंक फूडचं अजिबात सेवन करू नका. त्याशिवाय ड्राय फ्रूट्स आणि सीड्सचं सेवन करा.
जास्त तेलामुळे होणारे नुकसान
FSSAI चं असं मत आहे की, तेल किंवा फॅटच्या अधिक सेवनामुळे लठ्ठपणा व यासंबंधी नॉन कम्युनिकेबल डिजीज जसे की, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीस, हार्ट डिजीज इत्यादींचा धोका वाढतो.
तेलाचा सेवन कमी कसं कराल?
जेवणातून केवळ 20 कॅलरी फॅट मिळाल्या पाहिजे. यासाठी कमी तेल खरेदी करा आणि घरात याच्या वापरावर नजर ठेवा. जेवण तयार करताना बॉटलऐवजी चमच्याने तेल टाका. तळलेले पदार्थ खाण्याऐवजी उकडलेले, स्टीम केलेले पदार्थ खावेत.
साखर जास्त खाल्ल्याने नुकसान
कळत-नळत तुम्ही दिवसभरातून साखरेचं जास्त सेवन करतो जसे की, कोल्ड किंवा सॉफ्ट ड्रिंक्स, पॅकेज ज्यूस, कूकीज आणि चटपटीत इत्यादींचं सेवन करणं. यांच्या अधिक सेवनाने वजन वाढतं. तसेच डायबिटीस, हार्ट डिजीज इत्यादींचा धोकाही वाढतो.