How To Detox Your Body: फायबर भरपूर प्रमाणात असलेले पदार्थ खाल्ले तर पोटासंबंधी अनेक समस्या आपल्यापासून दूर राहतात. हेल्थ एक्सपर्ट्स सांगतात की, आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केला तर ब्लड शुगर लेव्हलही कंट्रोलमध्ये राहते. याने गट हेल्थ चांगली राहते आणि बद्धकोष्ठतेसारखी समस्याही दूर राहते. पण फार कमी लोकांना माहीत असेल की, फायबर असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरातील टॉक्सिनही बाहेर निघतं.
फायबर असलेले पदार्थ खाण्याचे फायदे
- जर तुम्ही ताळी फळं आणि भाज्यांचा आहारात समावेश कराल तर याने तुमचं शरीरा डिटॉक्सिाइंग होण्यास मदत मिळते.
- सध्या सणांचा महिना सुरू आहे. यादरम्यान आपल्याला आपल्या आहाराची खूप काळजी घ्यावी लागते. जास्त तळलेले, भाजलेले पदार्थ खाल्ल्याने तब्येत बिघडते आणि यादरम्यान पोटासंबंधी अनेक समस्याही होऊ लागतात. फायबर असलेले पदार्थ खाल तर पोटाला अनेक समस्यांपासून आराम मिळेल.
- शरीरातून टॉक्सिन बाहेर काढण्यासाठी भरपूर पाणी पिणं फार गरजेचं असतं. जर तुम्ही दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्याल तर शरीर हाइड्रेटेड राहतं.
- फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट करण्यास मदत मिळते. यासाठी एक्सरसाइज केल्यावरही टॉक्सिन बाहेर निघण्यास मदत मिळते.
- एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, हाय फाबयर फूड खाल्ल्याने तणाव कमी राहतो आणि मूड चांगला राहतो. यासोबतच गट हेल्थवरही चांगला प्रभाव पडतो.
- शरीरात फायबरची कमतरता असेल तर पचनही योग्यपणे होत नाही. ज्यामुळे शरीरात वेगाने फॅट जमा होऊ लागतं. फायबरने अन्नाचं पचन चांगलं होतं.
- बद्धकोष्ठतेची समस्या नेहमीच राहत असेल तर पाइल्ससारखी समस्या डोकं वर काढू शकते. त्यामुळे बद्धकोष्ठतेला हलक्यात घेऊ नका. ही समस्या दूर करण्यासाठी फायबरयुक्त पदार्थ खा.
फायबर कशात जास्त असतं
1. स्ट्रॉबेरी
2. हिरवे मटर
3. ब्रॉकली
4. बटाटे
5. डाळी
6. फ्लॉवर
7. गाजर
8. ओट्स
9. क्वीनोआ
10. बदाम
11. चिया सीड्स
12. केळी
13. सालीसहीत सफरचंद