कोरोनाने लोकांचे जीवन बदलले आहे. लोक प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. याशिवाय कोरोना संक्रमित व्यक्ती घरगुती उपचारांचा अवलंब करत आहे. गुळण्या करणं तोंडाच्या स्वच्छतेसाठी फायदेशीर ठरतं. डॉक्टरांचे म्हणणे आहे की गुळण्या केल्यानं घशातील घाण साफ होण्यास मदत होते. जर घसा खराब झाला असेल किंवा कोणत्याही प्रकारची सूज येत असेल तर या सवयीमुळे आराम मिळतो.
आजकाल लोक मीठ आणि हळदीच्या पाण्याने गुळण्यात करत आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की तोंडाच्या स्वच्छतेसाठी गुळण्या करणं आवश्यक आहे. आपल्याला कफची समस्या असल्यासही आराम मिळू शकतो. पण कोमट पाण्याच्या गुळण्या केल्याने काय फायदा होतो याबद्दल कोणतही साइंटिफीक रिसर्च (Scientific research) झालेला नाही.
गुळण्या कधी करायच्या?
जेवणानंतर गुळण्या करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. जेवण केल्यावर किंवा काही खाल्यावर गुळण्या करण्यानं शरीर चांगलं राहतं. यासाठी गार पाणी वापरलं तरी चालते. गुळण्या केल्याने दातामध्ये अडकलेले अन्नाचे कण निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे दात स्वच्छ राहतात.
कधी वेळा करायला हव्यात?
साधारणपणे दिवसातून 3 वेळाच गुळण्या कराव्यात. गुळण्या करताना कोमट पाणी वापरल्यास उत्तम ठरतं. कोरोनाकाळात समोर येत असलेल्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. पण, गुळण्या करणं तोंडाच्या स्वच्छतेसाठी चांगलं असतं.
हळदीच्या पाण्याच्या गुळण्या
हळदीमध्ये अँटी-सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. हळद अनेक प्रकारच्या समस्या दूर करते. परंतु यासाठी आपण ते योग्य प्रमाणात वापरणे महत्वाचे आहे. जास्त वापरण्यानं नुकसान होऊ शकते.
फक्त ताप, खोकला नाही तर या नव्या लक्षणांनी ओळखा कोरोना झालाय की नाही; वाचा तज्ज्ञांचा सल्ला
मीठाच्या पाण्यानं गुळण्या करणं
जर आपल्याला जास्त त्रास होत नसेल तर आपण कोमट पाण्यात चिमूटभर मीठ घालून गुळण्या करू शकता. आपण हा प्रकार दिवसातून तीनपेक्षा जास्त वेळा करु नये.
जास्त गुळण्या करण्याचे दुष्परिणाम
हाय बीपीचा त्रास असलेल्यांन मीठ कमी खाण्यास सांगितलं जात. मात्र हे लोक मीठ पाण्याच्या गुळण्या करत असतील, तर, थोड्याफार प्रामाणात मीठ शरीरात जातंच त्यामुळे त्यांच्या ब्लड प्रेशरवर परिणाम होऊ शकतो.
काही लोक कोमट पाण्याऐवजी गरम पाण्याने गुळण्या करतात. याचा घशावार उलटा परिणाम होतो. गरम पाण्याने घशाचा अल्सर (Ulcers) होऊ शकतो. त्यामुळे जास्त गरम पाण्याने गुळण्या करु नयेत. गरम पाण्याने घशात रॅशेस (Rashes) होतात किंवा तोंडही येऊ शकतं.
१० दिवस झाले ICU बेड मिळत नाही; तोंडावर ऑक्सिजन मास्क लावून एकटीच लढतेय तरूणी; समोर आला व्हिडीओ
घशामधील इन्फेक्शन बरं होण्यासाठी गुळण्या करणाऱ्यांनी उगीचच सतत गुळण्या करु नयेत. त्याने घश्याला सुज येऊ शकते. त्यामुळे इन्फेक्शन कमी होण्याऐवजी वाढू शकतं. अशावेळी घरगुती उपाय करण्यापेक्षा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.