कोणत्याही पदार्थाला चव येण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. खासकरून भारतीय आहारात लसणाचे खूप महत्व आहे. सध्याच्या काळाच प्रत्येक घराघरातील अनेक लोकांना नकळतपणे येत असलेल्या आजारपणांचा सामना करावा लागतो. पण तुम्हाला माहीत आहे का आरोग्याच्या दृष्टीने लसणाचे अनेक फायदे आहेत. दवाखान्यात न जाता तुम्ही घरच्याघरी लसणाचा आहारात समावेश करून स्वतःला आजारांपासून लांब ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत लसणाचे सेवन केल्याचे फायदे.
अनेक लोक लसणाचं सेवन करणं टाळतात. कारण त्यांना वास आवडत नसतो. ज्या पुरूषांना लैंगिक समस्या असातात अशा लोकांनी लसणाचे सेवन केले जर शरीरासाठी फायदेशीर ठरेल. लसणात व्हिटामीन बी १, बी ६, कॅल्शियम आणि सेलेनियम तसंच मॅगनीज हे पोषक घटक असतात. सर्दी, खोकला, दमा, निमोनिया अशा विकारांमध्ये लसणाचे सेवन फायदेशीर ठरते.
शरीरातून टॉक्सिन्स काढून टाकण्यासाठी
लसूण शरीरात असलेले घटक टॉक्सीन्स काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरत असतात. लसणाच्या सेवनामुळे शरीरातील हानीकारक घटक बाहेर पडण्यास मदत होते. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लसणाचं सेवन केलं तर पोटाचे विकार दूर होतील. गॅस, अपचन, पोट साफ न होणे यांसारख्या समस्या जाणवणार नाहीत.
कॉलेस्ट्रॉल वाढत नाही
लसणाचे सेवन कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करते. लसणामुळे रक्ताचे शुद्धीकरण होतेच, शिवाय रक्त पातळ होते. त्यामुळे रक्ताच्या गाठी निर्माण होत नाहीत. लसूण हृदयाला ऑक्सिजन रॅडीकल्सच्या प्रभावापासून वाचवितो. तसेच सल्फरयुक्त गुण रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊ देत नाही. अॅण्टी क्लोनिंग गुणांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत नाहीत. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास लसूण खूप फायदेशीर आहे. लसणात लोह असते. रक्त तयार होण्यास लोह आवश्यक असते. तसेच क जीवनसत्त्व असल्यामुळे स्कर्वी रोगापासूनही बचाव होतो. ( हे पण वाचा-किलर लूक मिळवण्यासाठी लोक करतात रायनोप्लास्टी, 'या' सर्जरीने नेमका कसा बदलतात लूक?)
केस गळणं थांबवते
लसणाच्या सेवनाने केस गळणे बंद होते. लसणात अॅलिसिनचे प्रमाण भरपूर आहे. तसेच सल्फरही असते. लसणाची पेस्ट डोक्याला लावल्यास केस गळणे कमी होते. लसणाच्या ५ पाकळ्या बारीक करून त्यात थोडे पाणी टाकावे. त्यात १० ग्रॅम मध मिसळावा. हे मिश्रण सकाळी आणि सायंकाळी सेवन करावे. यामुळे पांढरे केस काळे होतील. तसंच गळणं सुद्धा थांबेल.
रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
भाजलेला लसूण खाल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे लहान मोठ्या व्याधी शरीरापासून दूर राहून शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यास मदत होते. भाजलेली लसूण खाल्ल्याने हाडं बळकट होतात. लसणामध्ये अँटी बॅक्टेरियल तत्त्व आणि वेदना कमी करणारी तत्त्व आहेत. त्यामुळे संसर्ग झाल्याने जर दातदुखी होत असल्यास लसणीची एक पाकळी ठेचून ती दात दुखत असेल, तिथे ठेवावी. दातदुखी कमी होण्यास मदत होईल. ( हे पण वाचा-ऑफिसवर्कमुळे शरीराची चरबी वाढत असेल तर 'या' टिप्स वापरून स्वतःला ठेवा मेंटेन!)