- मयूर पठाडेसर्वधर्मसमभाव पाळा, स्त्री-पुरुष समानता राखा, प्रत्येकाला समान दर्जा द्या, लिंगभेदभाव तर नकोच नको..प्रत्येक जण हे आपल्या कानीकपाळी ओरडत असतो. इतरांचं जाऊ द्या, पण आपणही तर नेहेमी हेच सांगत असतो.पण तसं प्रत्यक्षात घडतं का? घडत नाही, असं नाही, पण १०० टक्के स्त्री-पुरुष समानता आपण पाळतो असंही होत नाही. कुठेच नाही. फक्त भारताच नाही, जगात कुठेच नाही.काही ठिकाणी कमी, काही ठिकाणी जास्त एवढाच काय तो फरक..पण ज्या ठिकाणी महिलांना स्वातंत्र्य दिलं गेलं, त्यांच्या मतांचा आदर केला गेला, त्याठिकाणी मात्र महिलांनी खूपच प्रगती केल्याचं दिसून आलं.अतिशय व्यापक प्रमाणावर एक अभ्यासच यासंदर्भात करण्यात आला.ज्या ठिकाणी स्त्री-पुरुष समानता आहे, तिथलं चित्र तर चांगलं होतंच, पण ज्याठिकाणी ही समानता नव्हती तिथल्या महिलांच्या बाबतीत आणि त्यांच्या भविष्याच्या बाबत अतिशय निराशाजनक अनुभव नोंदवण्यात आला.नंतरच्या आयुष्यात या महिलांची मानसिक शक्तीच कमी झाल्याचं आढळून आलं.उत्तर युरोपात ज्या ठिकाणी महिलांना अधिक स्वातंत्र्य आहे, अशा ठिकाणी तर महिलांनी पुरुषांपेक्षा खूपच चांगली कामगिरी बजावली. त्यांची स्मरणशक्तीही पुरुषांपेक्षा जास्त तल्लख असल्याचं आढळून आलं. याच्या विपरित स्थिती मात्र दक्षिण युरोपात होती.का व्हावं असं?शास्त्रज्ञांनी नोंदवलंय, मुलींना, महिलांना त्यांच्या लहान वयापासूनच दडपणात ठेवलं, संस्कृती, परंपरांच्या जोखडात बांधून ठेवलं, ज्ञानापासून त्यांना दूर ठेवलं, तर साहजिकच त्यांच्या वाढीवर त्याचा परिणाम होतो. भविष्यात त्यांची आकलन क्षमता, ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता कमी होते. पुरुषांच्या तुलनेत ती मागेही राहातात. पण तेच स्त्रियांना जर बरोबरीचं स्थान असलं तर अनेक क्षेत्रात त्या पुरुषांपेक्षा अधिक चांगली कामगिरी करतात.
महिलाच श्रेष्ठ! पण केव्हा? तुम्ही जर त्यांना समानतेची वागणूक दिलीत तरच..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 7:33 PM
स्त्री-पुरुष असमानतेच्या वातावरणात मात्र स्त्रियांची होते अधोगती..
ठळक मुद्देस्त्री-पुरुष समानतेच्या वातावरणात स्त्रियांची कार्यक्षमता वाढते.पुरुषांपेक्षा अनेक क्षेत्रात वरचढमात्र महिलांची गळचेपी केली तर त्या राहातात मागेचसामाजिक दडपणात खालावते महिलांची कामगिरी