मुलांना बनवा जीनियस !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2017 2:14 PM
आपला मुलगा जीनियस असावा असे प्रत्येक पालकांना वाटते. विशेषत: मुलांना बुद्धिमान बनविण्यात आई-वडील व घराचे वातावरण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.
-रवीन्द्र मोरे आपला मुलगा जीनियस असावा असे प्रत्येक पालकांना वाटते. विशेषत: मुलांना बुद्धिमान बनविण्यात आई-वडील व घराचे वातावरण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी दोन्ही गोष्टींमध्ये परिपूर्णत्व हवे. यासाठी प्रामुख्याने आई-वडिलांनी मेहनत घ्यायलाच हवी. आम्ही आपणास काही टिप्स देत असून, यांच्या साह्याने आपला मुलगा जीनियस बनवू शकता.कौतुकास्पद वागणूकलहान मुलांच्या पाठीवर नेहमी कौतुकाची थाप पडायला हवी. विशेष म्हणजे नवजात बाळाचे अधिक लाड केल्यास त्यांच्या मुलांच्या मेंदूच्या हिप्पोकँपस भागात अधिक नर्व्ह तयार होऊन बाळाची बुद्धी तीक्ष्ण होते, असे वॉशिंगटन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार स्पष्ट झाले आहे. पौष्टिक आहार मुलांच्या बौद्धिक विकासासाठी हिरव्या भाज्या, फळे, दूध, मेवा असा पौष्टिक आहार देणे गरजेचे आहे. तसेच मुलांना जंक फूड खाऊ देऊ नका. याने शारीरिक व्याधी निर्माण होतात. पुरेशी झोप मुलांच्या स्मरणशक्तीत वाढ होण्यासाठी दुपारच्या जेवणानंतर एक तास झोप घेणे आवश्यक आहे. युनिव्हर्सिटी आॅफ मॅसाच्युसेट्सच्या संशोधकांनुसार बुद्धी तल्लख बनवण्यासाठी दुपारची झोप महत्वाची आहे. स्तनपान डॅनिश संशोधकांनुसार स्तनपान करणारी मुले अधिक सशक्त व बुद्धिमान असतात. म्हणून नवजात बाळासाठी दुधापेक्षा उत्तम आहार कुठलाच नाही. पुस्तकांची आवड बहुतांश मुलांना पुस्तके वाचण्याची आवड असते. तुमच्या मुलाच्या या आवडीत बाधा न बनता त्याला प्रोत्साहन द्या.