पावसाळ्यात ओल्या वातावरणामुळे घरोघरी झुरळं वाढलेले बघायला मिळतात. या दिवसात झुरळ अधिक प्रमाणात येतात. याचा त्रास सर्वांनाच होतो. आरोग्यही धोक्यात येतं. काही लोक वेगवेगळे उपाय करतात पण तरीही झुरळं घरातून बाहेर जात नाहीत.
घरातील झुरळ पळवून लावण्यासाठी बाजारातील वेगवेगळ्या औषधांचा वापर केला जातो. पण याचा तुमच्याही आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. खासकरुन घरात जेव्हा लहान मुलं असतात. अशावेळी आम्ही तुमच्यासाठी काही खास घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.
1) तेजपत्त्याचा वापर
तेजपत्ताच्या सुगंधाने झुरळं बाहेर पळतात. घरातील ज्या कोपऱ्यात झुरळ अधिक प्रमाणात असतात त्याठिकाणी तेजपत्त्याची काही पाने बारीक करुन ठेवा. तेजपत्ते बारीक केल्यावर तुमच्या हाताला तेल लागल्याचे दिसेल. याच तेलाचा सुगंध झुरळांना पळवून लावतो. ही पाने काही दिवसांनी बदलत रहावी.
2) बेकिंग पावडर आणि साखर
एका वाटिमध्ये समान प्रमाणात बेकिंग पावडर आणि साखर मिश्रित करा. साखरेचा गोडव्याकडे झुरळं आकर्षित होतात. आणि बेकिंग सोड्यामुळे ते मारले जातात.
3) लवंग
झूरळाला घरातून पळवून लावण्यासाठी लवंगचा फार फायदा होतो. ज्या ज्या जागांवर झुरळं येतात त्या ठिकाणी काही लवंग ठेवाव्यात. लवंगेच्या उग्र दर्पामुळे झुरळं घरातून पळतात.
4) बोरिक पावडर
बोरिक पावडर घरातील काही जागांवर टाकल्यास झुरळं घरातून पळ काढतात. पण हे पावडर टाकताना काळजी घेणे गरजेचे आहे. घरातील लहान मुलांना या पावडरपासून दूर ठेवा.
5) केरोसिनचा वापर
केरोसिनचा वापर करुनही घरातील झुरळं पळवून लावता येतात. पण याच्या वासाने तुम्हालाही त्रास होऊ शकतो.
आणखी काही टिप्स:
1) पाण्याचा निचरा होणाऱ्या सर्व जागांवर जाळी लावावी.2) फळ किंवा भाज्याच्या साली जास्त वेळ घरात ठेवू नका.3) घरात अन्न सांडू नये याची काळजी घ्या.4) घरातील अन्न छाकून ठेवा.