शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

उशीरा उठताय? तर मधुमेहच तुमची झोप उडवेल...पाहा कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 5:14 PM

आयुर्वेदात पण असं म्हटलं गेलंय की उशीरा उठण्याचे फार तोटे असतात. त्यामुळे अनेक रोगांना आपण आमंत्रण देतो. आता हे नुकत्याच झालेल्या अभ्यासातूनही समेर आलं आहे की लवकर उठणाऱ्या लोकांना मधुमेहाचा धोका कमी असतो.

लवकर निजे लवकर उठे त्यास आयु आरोग्य लाभे.  आपल्या मुलांना आपण नेहमी हे शिकवतो. मात्र, बऱ्याचदा मोठी माणसंही लवकर उठत नाहीत. अशा लोकांना मधुमेहाचा धोका फार मोठ्या प्रमाणात असतो. असे का होते हे जाणून घ्यायचा प्रयत्न तुम्ही केला आहेत का? याचे उत्तम आम्ही तुम्हाला देतो.

आयुर्वेदात पण असं म्हटलं गेलंय की उशीरा उठण्याचे फार तोटे असतात. त्यामुळे अनेक रोगांना आपण आमंत्रण देतो. आता हे नुकत्याच झालेल्या अभ्यासातूनही समेर आलं आहे की लवकर उठणाऱ्या लोकांना मधुमेहाचा धोका कमी असतो.

इटलीच्या युनिव्हर्सिटी ऑफ नैपल्स फेडरिको सेकेंड या विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी केलेल्या रिसर्चनुसार लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या लोकांमध्ये जे लोक रात्री लवकर झोपून लवकर उठतात त्यांच्यामध्ये टाईप २ डायबेटीजचा धोका कमी असतो. यासाठी १७२ लोकांचा अभ्यास करण्यात आला. त्या अभ्यासाअंती समोर आले की,

लवकर झोपून लवकर उठणाऱ्या लोकांमध्ये उशीरा झोपून उशीरा उठणाऱ्यांच्या तुलनेत तेमधुमेहाचा धोका हा ६ पटीने कमी होता. तेच उशीरा झोपून उशीरा उठणाऱ्यांना इतरही आजारांचा धोका ४ पटीने जास्त होता.

याच युनिव्हरसिटीच्या वैज्ञानिकांनी आधी केलेल्या अभ्यासानुसार हा उशीरा उठणाऱ्यांमध्ये मधुमेहाची लक्षणं फार मोठ्या प्रमाणात आढळली होती. तसेच रात्री फार उशीरापर्यंत जागे राहणाऱ्या लोकांमध्ये अपचन, मानसिक तणाव, कमी रोगप्रतिकारक शक्ती इत्यादी समस्या आढळल्या होत्या.

मधुमेहाची लक्षणं

घसा कोरडा पडणेमधुमेहाचं सर्वात पहिलं लक्षण म्हणजे तुमचा घसा सतत कोरडा पडतो. तुम्हाला तहान लागत राहते. अशी लक्षण तुम्हाला दिसत असतील तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते.

सतत लघवीला होणेमधूमेहाचं दुसरं आणि महत्वाचं लक्षण म्हणजे सतत लघवी होणे. रात्रीच्या वेळी अथवा दिवसाही तुम्हाला सतत लघवी होत असेल तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता आहे.

थकवा येणेमधुमेह असणाऱ्या लोकांना थकवा फार लवकर येतो तसेच ही लोक सतत जांभई देतात.

धुसर दिसणेमधुमेहाचा परीणाम दृष्टीवरही होतो. यामुळे धुसर दिसण्याची शक्यता असते.

छोट्या जखमा भरण्यास वेळ लागणेमधुमेहाचं आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे जखमा लवकर बऱ्या होत नाहीत आणि शरीरावर पुरळ येते.