तूप प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. हे दुधाचा वापर करून तयार केले जाते. तूप हे लोणी आहे जे सामान्यतः फॅट्सयुक्त असल्याचे मानले जाते. मात्र, आयुर्वेदानुसार, तुपाचे काही आश्चर्यकारक आरोग्य फायदे आहेत. हे अँटीऑक्सिडंट्स, शरीरासाठी आवश्यक अशा पोषक फॅट्सनी समृद्ध आहे. तूप आपल्या एकूण आरोग्यासाठी चांगले आहेत. लोक आपल्या आहारात तुपाचे सेवन सोडतात कारण त्यांना वाटतं याने वजन वाढतं. परंतु तुम्हाला माहिती आहे का की सकाळी उठल्यावर एक चमचा तूप खाल्ल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. कोणते? जाणून घेऊया.
रोग प्रतिकारकशक्ती वाढवतंतुपात व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के असतात जे आपल्या आतड्यांचे आरोग्य उत्तम ठेवतात. तूप आतड्यांच्या हालचाली सुधारण्यास देखील मदत करते. हे बद्धकोष्ठतेसारख्या पचन समस्या दूर ठेवते. तूप शरीराला मजबूत बनवण्यास मदत करतं. हे आपल्या शरीरातून हानिकारक विष काढून टाकतं आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवतं.
हाडं मजबूत करतंबाजारात उपलब्ध रिफाइंड तेलांपेक्षा तूप जास्त सुरक्षित आहे. एका अभ्यासानुसार, तूप शरीराचे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं आणि चांगले कोलेस्टेरॉल वाढवतं. ज्यांना सांधेदुखी आणि हाडांच्या समस्या आहेत, त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात तूपाने करावी. तूप तुमच्या सांध्यासाठी वंगण आहे. त्यामुळे सांधेदुखी टाळते.
पचनक्रिया सुधारतंआपल्या शरीराला योग्य कार्य करण्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे आणि पोषक तत्त्वे आवश्यक आहेत. तूप जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि यामुळे ते पोषणाचे पॉवरहाऊस बनते. सकाळी एक चमचा तूप खाल्ल्याने तुमच्या शरीरात सर्व पोषक घटक योग्य प्रकारे शोषण्यास मदत होते.
वजन कमी करण्यास मदत करतंतूपात चरबी कमी असते आणि वजन कमी करण्यास मदत करते. तुप पचायला सोपे आहे. तूपामुळे आपली पाचन प्रणाली सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होतते. तुपात ब्युटीरिक अॅसिड आणि ट्रायग्लिसराइड्स असतात जे तुम्हाला शरीरातील हानीकारक चरबीपासून कमी करण्यास मदत करतात. तुपामध्ये अमीनो अॅसिड्स असतात जे पोटातील चरबी कमी करण्यास मदत करतात.