आयुर्वेदात गुळवेलाचा वापर औषधाप्रमाणे केला जातो. कोरोना माहामारीच्या काळात गुळवेलाचे वापर रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी सर्वत्र करण्यात आला होता. अमेरिकेतील फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशननेही वेगवेगळ्या प्रकारच्या उपचार पद्धतींना मंजूरी दिली आहे. काही लोक गुळवेलाची पानं उकळून त्याचे सेवन करतात. तर काहीजण कॅप्सूल, पावडर, ज्यूसच्या माध्यमातून गुळवेलाचे सेवन करतात. पण तुम्हाला माहीत आहे का? गुळवेलाच्या सेवनाचे जसे फायदे आहेत. तसेच साईडईफेक्ट्स सुद्धा आहेत. आज आम्ही तुम्हाला गुळवेलाच्या अतिसेवनाने होणाऱ्या साईड इफेक्ट्सबाबत अधिक माहिती देणार आहोत.
लो ब्लड शुगर
जर तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण कमी असेल तर गुळवेलाचे अतिसेवन थांबवायला हवे. गुळवेलातील पोषक गुण शरीरातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी मदत करतात. वैद्यकिय परिभाषेत याला हायपोग्लाइकेमिया म्हणतात. अशा लोकांनी गुळवेलाचे सेवन करण्यावर नियंत्रण ठेवायला हवं.
गॅसची समस्या
गुळवेलामुळे पचनशक्ती चांगले राहते. पण अति प्रमाणात सेवन केल्यानं गॅसची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे पोटाच्या अन्य समस्यांचा सामना करावा लागतो.
ऑटो इम्यून डिसॉर्डर-
कोरोना संक्रमणात गुळवेलाला रोगप्रतिकारकशक्ती वाढवत असलेल्या पदार्थांच्या स्वरूपात ओळख मिळाली. गुळवेलाचा रस किंवा पानं याचे अतिसेवन केल्यानं ऑटो इम्यून डिसॉर्डर होण्याचा धोका असतो. परिणामी मल्टीपल सेलोरोसिस, सिस्टोमिक ल्यूपस एरिथेमेटोसिस, रुमेटॉईड आर्थरायटीस अशा आजारांचा सामना करावा लागू शकतो.
सर्जरीच्याआधी सेवन करू नका
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही सर्जरीच्या आधी गुळवेलाचे सेवन नुकसानकारक ठरू शकतं. म्हणून कोणत्याही प्रकारे सर्जरी करण्यासाठी गुळवेलाचे सेवन करू नका. कारण त्यामुळे रक्तातील साखरेवर परिणाम होतो.
गर्भवती महिलांनी सेवन करूनये
गर्भवती महिलांनी गुळवेलाचे सेवन करावे की नाही. याबाबत स्पष्ट सांगता येणार नाही. कारण अनेक एक्सपर्ट्सच्या मते गुळवेलाचे सेवन या काळात टाळल्यास उत्तम ठरतं.
गुळवेलाचे सेवन कसे करायचे?
गुळवेल आणून ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यावे. काढा करण्यासाठी १ कप गुळवेल घेतल्यास त्याच्या दोन ग्लास पाणी घालावे. हे मिश्रण अर्ध होईपर्यंत उकळून घ्यावे. हा काढा चवीला कडसर लागतो. पण अत्यंत गुणकारी आहे.
गुळवेलाच्या सेवनाआधी ही काळजी घ्या
तुम्ही आधीपासून घेत मधुमेहाची औषध घेत असाल तर गुळवेलाचे सेवन करू नका.
गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी शक्यतो गुळवेलाचे सेवन करू नये.
कोणतीही शस्त्रक्रिया झाल्यावरही गुळवेलाचा वापर टाळावा. अतिशय गुणकारी असलेल्या गुळवेलाचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
(टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहिती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. )