शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
2
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
3
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
4
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
5
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
6
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
7
IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा
8
वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...
9
MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?
10
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
11
"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
12
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
13
भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट
14
"राज ठाकरे कधी रिव्हर्स गिअर घेतील आणि कधी…’’, त्या विधानावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया   
15
सारा अली खानचंं सीक्रेट अफेअर! भाजपा नेत्याच्या मुलाला करतेय डेट? केदारनाथला झाले स्पॉट
16
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
17
प्रियकरासोबत सापडली पत्नी! पती CRPF जवानाचा पारा चढला; रेल्वे स्टेशनवर एकच राडा...
18
IPL 2025मध्येही 'फोडाफोडी'चं राजकारण! पंतला CSKमध्ये आणायला धोनी लावतोय 'फिल्डिंग'?
19
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
20
कवठेमहांकाळात खेला होबे! रोहित पाटलांच्या विरोधात तीन रोहित पाटील; एकाच नावाचे ४ उमेदवार

मासिक पाळी आल्यावर मुलींची उंची का वाढत नाही? पालकांनी वेळीच जाणून घ्या कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 3:17 PM

पाळीमुळे होणाऱ्या हॉर्मोन्स बदलांमुळे 14 ते 15 व्या वर्षांपासून मुलींची उंची वाढणं कमी होतं. आज आपण या मागची कारणं सविस्तर जाणून घेणार आहोत.

मासिक पाळी (Periods) येणं हे नैसर्गिक आहे आणि यावर महिलांचं शारीरिक व मानसिक आरोग्य अवलंबून असतं. मुलीला पाळी सुरू झाली की, मुलगी वयात आली असं समजलं जातं. पण पाळी आल्यानंतर मुलींची उंची वाढणं कमी होतं. पाळीमुळे होणाऱ्या हॉर्मोन्स बदलांमुळे 14 ते 15 व्या वर्षांपासून मुलींची उंची वाढणं कमी होतं. आज आपण या मागची कारणं सविस्तर जाणून घेणार आहोत. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय.

मुलींची शारीरिक वाढ कधी थांबते?लहानपणी मुलींची उंची (Height) खूप वेगाने वाढते आणि वयात येताच त्यांची वाढ पुन्हा खूप जास्त होते. पण वयाच्या 14 ते 15 वर्षी किंवा मासिक पाळी सुरू झाल्यावर मुलींची उंची झपाट्याने वाढणं थांबतं. अशा परिस्थितीत मुलीची उंची खूप कमी असेल तर तिच्या पालकांनी एखाद्या चांगल्या बालरोगतज्ज्ञांना भेटून मुलीच्या उंचीबद्दल चर्चा करणं आणि त्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

वयात येणं शरीराच्या वाढीवर कसं परिणाम करतं?मासिक पाळी सुरू होण्याच्या एक-दोन वर्षआधी मुलींची जास्त वाढ झाल्याचं दिसून येतं. पण बहुतेक मुली 8 ते 13 व्या वर्षी वयात येऊ लागतात. आणि नंतर त्यांची उंची 10 ते 14 वर्षांच्या दरम्यान वेगाने वाढते. पहिल्यांदा पाळी आल्यानंतर एक किंवा दोन वर्षानंतर त्यांची उंची फक्त 1 ते 2 इंच वाढते. या दरम्यान ती तिच्या अडल्ट हाइटवर पोहोचते. अनेक मुली 14 ते 15 वर्षांच्या वयापर्यंत त्यांच्या अडल्ट हाइटपर्यंत पोहोचतात. काही मुली कमी वयातच अडल्ट हाइटपर्यंत (Adult Height) पोहोचतात. त्यामुळे मुलीची मासिक पाळी कधी सुरू होत आहे यावर तिची अडल्ट हाइट अवलंबून असते. जर 15 व्या वर्षापर्यंत तुमच्या मुलीची पाळी आली नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

स्तनांचा आकार वाढणं आणि वयात येणं, यांचा काय संबंध?स्तनांचा आकार (Breast Size) वाढणं हे मुलगी वयात येण्याचं लक्षण असतं. कोणत्याही मुलीची मासिक पाळी सुरू होण्याच्या 2 वर्ष आधी स्तनांचा आकार वाढू लागतो. तर, काही मुलींमध्ये मासिक पाळी सुरू झाल्यानंतर एक वर्षानंतरच ब्रेस्ट बड्स दिसू लागतात. त्याचबरोबर काही मुलींमध्ये मासिक पाळीच्या तीन ते चार वर्षानंतरही स्तनांचा आकार वाढण्यास सुरुवात होत नाही.

मुलांपेक्षा मुली आधी वयात येतात. साधारणपणे मुलं वयाच्या 10 ते 13 वर्षांच्या दरम्यान वयात येऊ लागतात आणि 12 ते 15 वर्षांच्या दरम्यान त्यांची शारीरिक वाढ होते. याचा अर्थ मुलींमध्ये वाढ झाल्यानंतर दोन वर्षांनी मुलांमध्ये वाढ सुरू होते. बहुतेक मुलांची उंची वाढणं वयाच्या 16 व्या वर्षापर्यंत सुरू राहतं. पण त्यांच्या स्नायूंमध्ये वाढ सुरू असते.

मुलींची सरासरी उंची किती असते?सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शननुसार (CDC) 20 आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढ महिलांची सरासरी उंची 63.7 इंच म्हणजे साधारण 5 फूट 4 इंच असते. उंचीमध्ये अनुवंशिकता कोणती भूमिका बजावते? मुलाची उंची सहसा पालकांच्या उंचीवर अवलंबून असते. कारण उंची कमी असलेल्या मुलांना घेऊन तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यावर ते आधी पालकांच्या उंचीबद्दल विचारतात.

उंची वाढण्यास वेळ लागण्याची कारणं कोणती?कुपोषणापासून ते औषधांपर्यंत अनेक गोष्टी तुमच्या शरीराच्या वाढीवर परिणाम करू शकतात. ग्रोथ हॉर्मोनच्या समस्या, संधिवात किंवा कॅन्सर अशा विविध रोगांमुळे काही मुलींची उंची वाढत नाही. शिवाय जीन्सदेखील उंची वाढण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स