मुलींनो, १८ वर्षानंतर घडतात हे ‘सहा’ बदल !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2017 7:59 AM
१८ वर्षानंतर मुलगी वयात येत असते, त्यानुसार हार्मोनल बदल घडून तिच्या शरीरातही अनेक बदल घडतात..
-Ravindra Moreवयाबरोबर मुलींमध्ये बरेच शारीरिक बदल घडतात. यादरम्यान कित्येक आरोग्याच्या समस्याही उद्भवतात, ज्यांची योग्यवेळी काळजी घेतल्यानंतर योग्य उपचार केला जाऊ शकतो. काही गायनोकोलॉजिस्टच्या मते, १८ वर्ष वयानंतर मुलींच्या शरीरात ६ बदल घडत असतात. काय होतात बदल व त्यावर काय उपाय कराल१) केसांवर परिणाम१८ वर्षानंतर हार्मोनल बदल घडत असल्याने मुलींचे केस ड्राय आणि रफ होतात. यावर उपाय म्हणजे ३-४ चमच आॅलिव्ह आॅइल गरम करुन थोडे कोमट झाल्यानंतर केसांवर मसाज करा, त्यांनर टॉवेलला थोडे गरम करुन केसांवर बांधून ठेवा. २) वजन वाढणे१८ वर्षानंतर मुलींचे मेटाबॉलिज्म सावकाश होतो, ज्या कारणाने वजन वाढण्याची समस्या निर्माण होते. यासाठी जास्त तेलकट आणि साखरयुक्त पदार्थ खाणे टाळावे. शिवाय कमीत कमी ३० मिनिटे चालणे किंवा व्यायाम करावा. ३) पिंपल्स१८ वर्षानंतर मुलींच्या शरीरात हार्मोनल बदल होत असल्याने पिंपल्स आणि ड्राय स्किनची समस्या निर्माण होते. यासाठी जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळावे. चेहरा दिवसातून २ ते ३ वेळा पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील तेलकटपणा नियंत्रणात राहील आणि पिंपल्सची समस्या उद्भवणार नाही.४) मासिक पाळी१८ वर्षानंतर हार्मोनल बदल वेगाने होतात, यामुळे बऱ्याचदा मासिक पाळीच्या वेळेत समस्या निर्माण होतात. यासाठी डायटमध्ये फळ आणि हिरव्या भाज्यांचे प्रमाण वाढवा. यामुळे मासिक पाळीची समस्या सुटेल, जर ही समस्या जास्त प्रमाणात असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.५) केस१८ वर्षानंतर मुलींची छाती, पोट तसेच गुप्तांगात केस यायला सुरुवात होते. केस हटविण्यासाठी हेअर रिमूव्हल क्रिम किंवा रेजरचा वापर करु शकता. रेजरच्या साह्याने केस कायमस्वरुपीदेखील हटवू शकता. ६) प्रतिकारशक्ती वाढणे१८ वर्षानंतर हार्माेनल बदल घडत असल्याने मुलींची प्र्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे ती धाडसी होते.