सौंदर्यवृद्धीसाठी आपण अनेक उपाय करतो. महागडे सौंदर्य प्रसाधने, ब्यूटी पार्लरचा वारंवार वापर आदी उपायांनी वेळ आणि पैसा दोघेही वाया जातात. मात्र बाह्य उपचारापेक्षा चांगली झोप, सक स आहार, व्यायाम आदी गोष्टी अधिक महत्वाच्या असतात हे अनेकजण विसरतात. आता संशोधकांनी म्हटले आहे की सौंदर्यवृद्धीसाठी चांगली झोप अत्यावश्यक आहे.* चांगल्या झोपेमुळे चेहरा टवटवीत होतो आणि तेजस्वी दिसतो, मात्र एक-दोन रात्री पुरेसी झोप झाली नाही तरी चेहºयावर त्याचे परिणाम लगेचच दिसू लागतात. * झोपताना मात्र उशी न घेता झोपावे. तज्ज्ञांच्या मते, उशीविना झोपणे अधिक फायदेशीर आहे याने शरीर नैसर्गिक स्थितीमध्ये असतं आणि लहान मुलांसारखी झोप येते. उशी ने घेता झोपण्याने आरोग्य तर उत्तम राहताच सौंदर्य वाढविण्यासाठी हे योग्य आहे.* उशीविना झोपल्याने चेहºयावर पिंपल्स येण्याची शक्यता नाहीशी होते. कारण उशी वापरल्याने त्यावर जमा असलेल्या धुळीमुळे पिंपल्स होण्याची शक्यता नाकारता येत नाही.* उशी वापरल्याने चेहºयावर दबाव पडत असतो ज्याने वयापूर्वी सुरकुत्या येतात.* उशी घेऊन झोपल्याने अधिक काळ झोप घेतल्यावरदेखील थकवा जाणवतो परंतू उशी न वापरल्याने तणावरहित झोप लागते ज्यामुळे त्वचा फ्रेश राहते आणि आपण नेहमी तरुण दिसतात.* ज्यांना झोप न येण्याची तक्रार असते त्यांनी उशी घेतल्याविना झोपावे ज्याने शांत झोप लागते आणि रिलॅक्स जाणवतं. शरीर रिलॅक्स असल्यास चेहºयावरील ग्लो आपोआप वाढतो.
सौंदर्यवृद्धीसाठी चांगली झोप महत्त्वाची !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2018 7:55 AM