शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
2
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
3
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
4
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
5
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
6
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
7
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
8
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
9
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
10
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
11
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
12
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
13
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
14
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
15
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
16
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
17
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
18
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
19
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
20
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 

कॅन्सरवर होणार आता स्वस्तात उपचार, 42 औषधांच्या किमतीत मोठी कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 2:49 PM

कॅन्सरवरील 42 नॉन-शेड्यूल्ड औषधांच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. भारत सरकारने कॅन्सरच्या औषधांवरील विक्रीवर असलेले ट्रेड मार्जिन (trade margins) 30 % केले आहे.

ठळक मुद्देकॅन्सरवरील 42 नॉन-शेड्यूल्ड औषधांच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. भारत सरकारने कॅन्सरच्या औषधांवरील विक्रीवर असलेले ट्रेड मार्जिन (trade margins) 30 % केले आहे. ट्रेड मार्जिन अंतर्गत या औषधांवर मूल्य नियमनाअंतर्गत (price regulation) सूट मिळणार आहे.

नवी दिल्ली - कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर ठोस असा उपाय समोर आलेला नाही. अनेक प्रकारच्या सर्जरी आणि कीमोथेरपीच्या मदतीने कॅन्सरवर उपचार करता येतात. कॅन्सरग्रस्त व्यक्तींसाठी आता एक खूशखबर आहे. कॅन्सरवरील 42 नॉन-शेड्यूल्ड औषधांच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.

भारत सरकारने कॅन्सरच्या औषधांवरील विक्रीवर असलेले ट्रेड मार्जिन (trade margins) 30 % केले आहे. ट्रेड मार्जिनमधून औषधं विक्रेता आणि होलसेलर औषधं विक्रेता जबरदस्त नफा कमवतात. त्यामुळे औषधांच्या किंमती अधिक वाढल्या आहेत. ट्रेड मार्जिन अंतर्गत या औषधांवर मूल्य नियमनाअंतर्गत (price regulation) सूट मिळणार आहे. डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल्सने याबाबत एक नोटिफिकेशन जारी केले आहे.

कॅन्सर या आजारावरील उपचार खर्चिक असतात. त्यामुळे या औषधांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 8 मार्चपासून या नव्या किंमती लागू करण्यात येणार आहेत. ‘ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर’, 2013 च्या पॅरा 19 चा वापर हा व्यापारातील नफा ठरविण्याकरिता सरकारने केला आहे. या यादीत समाविष्ट नसलेल्या औषधांवर कंपन्या इच्छेनुसार ट्रेड मार्जिन लागू शकतील. 

एका वर्षात कॅन्सर नष्ट करणाऱ्या औषधाचा शोध, संशोधकांनी केला दावा!कॅन्सर मुळातून नष्ट होण्याचं प्रमाण फार कमी आहे. कॅन्सरबाबत जगभरात सतत वेगवेगळे शोध सुरू असतात. असाच एका शोध इस्त्राइलच्या संशोधकांनी केला आहे. या शोधात त्यांनी दावा केला आहे की, ते कॅन्सरला नष्ट करणारं असं औषध तयार करू शकतात, ज्याने कॅन्सर एका वर्षात बरा होऊ शकतो. 

बायोटेक कंपनी AEBi चा दावा

तसे तर कॅन्सरवर वेगवेगळे उपचार केले जातात. पण हा आजार मुळातून नष्ट करण्याचा दावा कुणीच करत नाही. पण इस्त्राइलच्या अ‍ॅक्सिलेरेटेड इवॉल्यूशन बायोटेक्नॉलॉजी लिमिटेड (AEBi) कंपनीने हा दावा केला आहे. त्यांनी दावा केलाय की, कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराला ते पूर्णपणे दूर करू शकतात. 

या शोधात दावा करण्यात आला आहे की, बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीने आणि पेप्टाइड्सच्या मदतीने कॅन्सरला नष्ट करणारं औषध तयार करण्यात आलं आहे. पेप्टाइट्सला अमीनो अ‍ॅसिडचं रूप मानलं जातं. सध्या या शोधात तयार करण्यात आलेलं औषध मनुष्यावर वापरण्यात आलेलं नाहीय. शोधादरम्यान या औषधाचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला होता. त्यावरून हा दावा करण्यात येत आहे. पण या दाव्यावर इतर संशोधकांनी टीका केली आहे.  

टॅग्स :cancerकर्करोगmedicinesऔषधंMedicalवैद्यकीय