कोरोनाची माहामारी पसरायला आता वर्ष पूर्ण होईल. आतापर्यंत कोरोनाचं कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध झालेली नाही. जगभरात कोरोनाची लस लवकरत लवकर तयार व्हावी यासाठी वैज्ञानिकांकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान कोरोनाच्या उपचारांबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या औषधाने २४ तासांमध्ये कोरोना रुग्णाचे उपचार केले जाऊ शकतात. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे एक एंटी व्हायरल ड्रग असून कोरोना व्हायरसला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी हे औषध प्रभावी ठरत आहे. या औषधाचे नाव MK-4482/EIDD-2801 या औषधाला मोल्नूपीराविर (Molnupiravir) असं म्हटलं जातं.
कोरोनाकाळात गेम चेंजर ठरू शकतं हे औषध
जर्नल ऑफ नेचर माइक्रोबायलॉजीमध्ये छापण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार या औषधाने कोरोना रुग्णांमध्ये संक्रमण पसरण्यापासून रोखता येऊ शकतं. तसंच पुढे उद्भवत असलेल्या गंभीर आजारांपासून वाचवता येऊ शकतं. या अभ्यासाचे लेखक रिचर्ड प्लेंपर यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदाच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अशा प्रकारचे औषध तयार करण्यात आले आहे. MK-4482/EIDD-2801 हे औषध कोरोना रुग्णांसाठी गेम चेंजर ठरले आहे.
हिवाळ्यात मेथीच्या सेवनाचे 'हे' ७ फायदे वाचून व्हाल अवाक्, आजारांपासून लांब राहण्याचा सोपा फंडा
हे औषध जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या रिसर्च टीमने शोधले आहे. सुरुवातीच्या संशोधनात हे औषध इन्फ्लूएन्झासारखे घातक फ्लू दूर करण्यात प्रभावी असल्याचे आढळले. त्यानंतर फेरेट मॉडेलच्या माध्यमातून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी यावर संशोधन करण्यात आले. हे संशोधन करण्यासाठी, शास्त्रज्ञांनी प्रथम कोरोना व्हायरसने काही प्राण्यांना संक्रमित केले. या प्राण्यांच्या नाकातून व्हायरस सोडण्यास सुरुवात करताच त्यांना MK-4482/EIDD-2801 मोल्नूपीराविर देण्यात आले. त्यानंतर या संक्रमित प्राण्यांना निरोगी प्राण्यांसोबत त्याच पिंजऱ्यात ठेवण्यात आले.
'या' उपायाने ४५ टक्क्यांनी कमी होतोय जीवघेण्या व्हायरसचा धोका, संशोधनातून खुलासा
या अभ्यासाचे लेखक जोसेफ वॉफ्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार संक्रमित प्राण्यांसोबत ठेवलेल्या निरोगी प्राण्यांमध्ये संक्रमण पसरलं नव्हतं. त्याचप्रमाणे कोरोना रुग्णांवर मोल्नूपीराविर (Molnupiravir) या औषधांचा वापर केला तर २४ तासांच्या आत कोरोनाचं संक्रमण कमी करता येऊ शकतं.