गुगल वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगाने आपले पाय पसरत आहे. आता गुगलने मेडिकल क्षेत्रातही आपला स्थान निर्माण करण्यासाठी काही पावले उचलली आहेत. गुगलच्या संशोधकांनी एक नवीन आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मॉडल विकसित केलं असून संशोधकांनी दावा केला आहे की, हे मॉडल एक्सपर्ट डॉक्टरांच्या तुलनेत लवकर आणि चांगल्याप्रकारे फुप्फुसाच्या कॅन्सरची माहिती मिळवू शकेल.
डीप लर्निंग सिस्टीम
संशोधकांनुसार, डीप लर्निंग जो आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा एक फॉर्म आहे. ज्यात कॉम्प्युटरला असं तयार करण्यात आलं आहे की, हे फुप्फुसात असलेल्या जीवघेण्या कॅन्सरची माहिती लवकर आणि चांगल्या प्रकारे मिळवण्यासाठी कोणत्याही एक्सपर्ट रेडिओलॉजिस्टच्या तुलनेत अनेक पटीने पुढे आहे. डीप लर्निंग सिस्टीम याआधी करण्यात आलेल्या सीटी स्कॅन आणि जेव्हा गरज असेल तेव्हा इनपुटच्या अनुषंगाने पुन्हा एक सीटी स्कॅन घेऊन दोन्हींचा वापर करतो.
कॅन्सरच्या गाठेची ग्रोथ रेट टेस्ट
आधी घेण्यात आलेला सीटी स्कॅन लंग कॅन्सरची माहिती घेण्यात आणि फुप्फुसात कॅन्सरमुळे नुकसान किती वाढलं आहे, हे माहिती मिळवण्यास फार मदत करतो. सीटी स्कॅनच्या माध्यमातून फुप्फुसात कॅन्सरच्या गाठीचा ग्रोथ रेट किती आहे हे कळतं. या खास एआय मॉडल ने एक-दोन नाही तर ६ रेडिओलॉजिस्टला मात दिली आहे. तेही तेव्हा जेव्हा पहिल्यांदा करण्यात आलेला सीटी स्कॅन उपलब्ध नव्हता.
(Image Credit : YouTube)
एआय थ्रीडी इमेजची तपासणी करतं
एक्सपर्टनुसार, सामान्यपणे रेडिओलॉजिस्ट्स शेकडो २डी इमेजेस किंवा सिंगल सीटी स्कॅन इमेजचा अभ्यास करतात. पण नवीन मशीन लर्निंग सिस्टीम ३डी इमेजमध्ये फुप्फुसांना बघतं. एआय ३डी मध्ये फार जास्त संवेदनशील होतं आणि रेडिओलॉजिस्टच्या तुलनेत अनेक पटीने चांगल्याप्रकारे फुप्फुसात झालेल्या कॅन्सरची माहिती मिळवतं.