देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा स्थितीत सरकारने वेगवेगळ्या उपायांवर विचार करायला सुरूवात केली आहे. केंद्र सरकार कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी लसीची तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकिय चाचणीनंतर नियमित लायसेंस दिलं जाण्यासाठी विचार करत आहे. आपातकालीन स्थितीत या लसीच्या वापर केला जाऊ शकतो.
एका बैठकीत लसीचे मुल्यांकन, लस खरेदीचे व्यवस्थापन यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत नीती आयोगाचे सदस्य विनोद पॉल, वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन आणि केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांचा समावेश होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत लसीच्या आपातकालीन वापराबाबत चर्चा करण्यात आली होती.
फायजर कंपनीनेही परवानगीसाठी निवेदन केले आहे.
हा घटनाक्रम जेव्हा समोर आला तेव्हा कंपनीने अमेरिकी नियामकांकडून कोरोना व्हायरसच्या लसीच्या आपातकालीन वापरासाठी अधिकार मागितले होते. अमेरिकन लस निर्मीत कंपनी मॉर्डनाने सुद्धा अमेरिकेतील खाद्य आणि औषधी प्रशासनाकडून येत्या काही आठवड्यात आपातकालीन वापरासाठी निवेदन दिले आहे. यादरम्यान भारतात पाच लसींच्या वैद्यकिय चाचण्या विविध टप्प्यात सुरू होणार आहेत.
सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफोर्ड एक्स्ट्राजेनका लसीचे तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परिक्षण करत आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआरने स्वदेशी विकसित कोवॅक्सिनच्या शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरू केली आहे. जायडस कँडिला या स्वदेशी लसीच्या सुद्धा शेवटच्या ट्प्प्यातील चाचण्या सुरू आहेत. स्पूटनिकच्या लसीची सुद्धा चाचणी सुरू होणार आहे.
दिलासादायक! भारतीय अमेरिकन डॉक्टरांनी शोधले कोरोनाचे संभाव्य उपचार; उंदरांवरील चाचणी ठरली यशस्वी
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लवकरात लवकर स्पुटनिक व्ही या रशियन लसीचे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू करणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जगभरातील लसीच्या वैज्ञानिक स्थिती, आपातकालीन उपयोगासाठी अधिकृत परवानगी मिळवण्यावर विचार केला जात आहे.
वाढत्या थंडीमुळे होणारी सर्दी, एलर्जी की कोरोनाचं इन्फेक्शन? जाणून घ्या लक्षणांमधील फरक
दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, कोरोनावरील लसींचे परीक्षण जागतिक पातळीवर सुरू आहे. ब्रिटन, अमेरिका आणि रशियासह अनेक देशांतील कंपन्या कोरोनाविरोधात लस विकसित करून जगाला दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहेत. हैदराबादमधील भारत बायोटेकसुद्धा त्यापैकीच एक आहे. या कंपनीकडून कोव्हॅक्सिन विकसित करण्यात येत आहे. तसेच या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. दरम्यान, भारतात तयार झालेली कोव्हॅक्सिन ही लस कोरोनाविरोधात ६० टक्के प्रभावी असल्याचा दावा ही लस निर्माण करत असलेल्या कंपनीचे अध्यक्ष साई डी. प्रसाद यांनी केला आहे.