Green Chickpeas Health Benefits: हिवाळ्यात अनेक फळं आणि भाज्या मिळतात. ज्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतात. याच दरम्यान हरभराही निघतो. हिरवे आणि कच्चे चणे भाजून भरपूर खाल्ले जातात. अनेकजण कच्च्या चण्याची भाजीही भरपूर करतात. हरभरा खाण्यास चविष्ट तर असतोच सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. पोषक तत्व भरपूर असलेला हरभरा किंवा हिरवे चणे खाल्ले तर अनेक गंभीर समस्यांपासून तुमचा बचाव होऊ शकतो.
हरभऱ्यात असलेले पोषक तत्व
हरभऱ्यामध्ये प्लांट बेस्ड प्रोटीन असतं. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के भरपूर असतं. तसेच यात फायबर, आयरन, फोलेट, फॉस्फोरस, सोडिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, सेलेनियम, कॅल्शिअम, कॅलरी, फॅट्स, कार्बोहाइड्रेट्स, फॅटी अॅसिडसारखे पोषक तत्व असतात.
मासंपेशी होतात मजबूत
हिरव्या चण्यामध्ये प्लांट बेस्ड प्रोटीन असतं. ज्यामुळे याचं सेवन केलं तर मांसपेशी मजबूत होतात. तसेच यातील प्रोटीनमुळे हाडेही मजबूत होतात.
गर्भवती महिलांसाठी फायदेशीर
हरभरा खाल्ल्याने गर्भवती महिलांनाही फार फायदा होतो. यातील व्हिटॅमिन बी 9 भ्रूणाचा विकास करण्यासाठी मदत करतं. तसेच याने गर्भपातासारख्या स्थितीपासून बचाव करण्यासही मदत मिळते.
पचनासंबंधी समस्या होते दूर
हरभरा खाल्ल्याने पचनासंबंधी समस्या दूर करण्यास मदत मिळते. कारण यात फायबर भरपूर असतं. याने मेटाबॉल्जिम वाढवण्याचं काम केलं जातं. हरभरा खाल्ल्याने कोलोन कॅन्सर होण्याचाही धोका कमी राहतो.
हार्ट राहतं हेल्दी
हरभरा हार्टसाठीही फार फायदेशीर मानला जातो. यात मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असतं. जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करतं. हरभरा बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करतं. याच्या सेवनाने बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढतं.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
हरभरा त्वचा, केस आणि नखांसाठी फायदेशीर असतो. यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. याने केस मजबूत होतात. हरभऱ्याने ड्राय स्किनची समस्या दूर होते. याने नखंही मजबूत होतात.