कानपूर : जगभरात ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. ब्रेस्ट कॅन्सरचे वाढते प्रमाण ही आता चिंताजनक बाब बनली आहे. या कॅन्सरच्या महागड्या उपचारांमुळे अनेकांच्या पदरी निराशाच पडताना दिसून येते. पण, फक्त एक रुपयात ब्रेस्ट कॅन्सरचा उपचार होऊ शकतो, यावर तुमचा विश्वास बसेल का? तर कानपूरच्या जीएसव्हीएम (GSVM) मेडिकलने पुढाकार घेऊन केवळ एक रुपयात ब्रेस्ट कॅन्सर उपचाराचे स्वप्न साकार केले आहे.
मेडिकल कॉलेजमधील होतकरू डॉक्टरांनी नवीन टेक्नॉलॉजी शोधून काढली आहे. पहिल्यांदाच ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांवर ऑन्को मॅमोप्लास्टी टेक्नॉलॉजीने उपचार करण्यात आले आहेत. जीएसव्हीएम मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय काला यांनी सांगितले की, या टेक्नॉलॉजीद्वारे ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या ब्रेस्टमधून फक्त संक्रमित भाग काढून टाकला जातो आणि त्याऐवजी व्हॉल्यूम रिप्लेसमेंट पद्धतीने त्याचा आकार बदलला जातो.
या टेक्नॉलॉजीद्वारे 48 वर्षीय रुग्णाचे ऑपरेशन करण्यात आले, जे यशस्वी झाले. आधी ब्रेस्ट कापल्यामुळे बऱ्याच महिला डिप्रेशनच्या शिकार होत होत्या. काही वेळा महिला आत्महत्येचे पाऊलही उचलत होत्या. पण, आता या टेक्नॉलॉजीचा खूप फायदा होईल, असे डॉ. संजय काला यांनी सांगितले. दरम्यान, या ऑपरेशनमध्ये प्लास्टिक सर्जन डॉ. प्रेम शंकर, डॉ. संजय काला, डॉ. शुभम, डॉ. पुनीत यांनी सहभाग घेतला होता.
मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेण्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे तुम्हाला फक्त 1 रुपयांचा फॉर्म भरावा लागेल, त्यावर सर्व उपचार केले जातील. याशिवाय, अनेक शासकीय योजनांचा लाभही थेट रुग्णांना दिला जात आहे, असेही डॉ. संजय काला यांनी सांगितले. तसेच, या ऑपरेशनबद्दल बोलायचे झाले तर खासगी हॉस्पिटलमध्ये याची किंमत 5 ते 10 लाख रुपये आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचा असा एखादा रुग्ण असेल तर तुम्ही ही बातमी त्याच्यासोबत शेअर करू शकता.
भारतात दर 4 मिनिटाला एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सर!ब्रेस्ट कॅन्सर इंडियाने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, भारतात दर चार मिनिटाला एका महिलेला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान होते. तर दर आठ मिनिटांना एका महिलेचा ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत्यू होतो. ही आकडेवारी धक्कादायक आहे. परंतु, ब्रेस्ट कॅन्सरचे वेळीच निदान झाले तर ब्रेस्ट कॅन्सर बरा होऊ शकतो. मात्र, बहुतांश महिला लक्षणे दिसत असूनही, त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, तसे करू नका! घरच्या घरी ब्रेस्टची हाताने चाचपणी करण्याबरोबरच मेमोग्राफीसारख्या चाचण्याही करून घ्याव्यात, असा सल्ला स्त्रीरोगतज्ज्ञांकडून महिलांना दिला जातो.
ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणेब्रेस्टमध्ये वारंवार दुखणे, तेथील त्वचा लाल होणे, किंवा रंग बदलणे. ब्रेस्टच्या आजूबाजूला सूज येणे, निप्पल डिस्चार्ज, निप्पलमधून रक्त येणे, ब्रेस्टची किंवा निप्पलची त्वचा सोलवटणे, ब्रेस्टच्या आकारात बदल होणे, निप्पल आतल्या बाजूला जाणे. काखेच्या खाली गाठ किंवा सूज येणे, अशा लक्षणांचा यात समावेश होतो.