दैनंदिन आयुष्य जगत असताना ऑफिसमध्ये बराच वेळ काम करत असता. तसंच तुम्ही जेव्हा घरी येता तेव्हासुद्धा स्वतःला वेळ न देता घरात काही काम करत असता. जर तुम्ही काहीच न करता काहीवेळ फक्त बसलेले असाल तर अस्वस्थता वाटणं हा एक प्रकारचा आजार असू शकतो. चला तर मग जाणून घेऊया हातात जर काही काम नसेल तर काही लोकांना अस्वस्थ का वाटतं.
सर्वसाधारणपणे मानसीक आणि भावनिकदृष्या सतत बीझी असणं हे धोकादायक असतं. काही व्यक्तींना कोणालाही वेळ देण्यापेक्षा स्वतःमध्ये रमायला आणि पुस्तकांमध्ये तासनतास रमायला खूप आवडत असतं. तज्ञांच्या म्हणण्यानुसार पैसे मिळवणं, आणि पैसे वाचवणं हे लोकांना माहीत असतं पण त्याचा वापर कसा करायचा हे माहीत नसतं. अशी लोकं जगण्याचा आनंद घेऊ शकत नाहीत. जगण्याचा आनंद त्यांना घेता येत नाही. सतत कामात बीझी राहण्याची सवय असेल तर कमी वयात सुद्धा नकळतपणे मानसीक आजार होऊ शकतात.
(image credit- counselling on demand)
जॉन कबाट-जिन्न यांनी आपल्या पुस्तकात असं नमुद केलं होत की जॉन कबाट यांनी आपलं पूर्ण जीवन हे सतत व्यस्त असण्याचा आजार रोखण्यासाठी घालवलं. आपण स्वतःला जर खूप व्यस्त ठेवत असू तर त्याला काही मर्यादा असायला हव्यात तसंच जास्त कामात गुंतून न जाता स्वतःकडे लक्ष देणं सुध्दा तितकचं महत्वाचं आहे. आपल्या कामातून थोडासा वेळ काढून गाणी ऐकणे, चांगल्या कथा वाचणे, स्वतःशी गप्पा मारणे अशा एक्टीव्हीटीज करायला हव्यात.
व्यायाम करायला हवा तसंच योगा करणंसुद्धा फायदेशीर ठरतं. वाढतं तंत्रज्ञान आणि पर्यावरण यांच्यातल्या संबंधाचा ताळमेळ ठेवून आपण जीवन जगायला हवं. तसंच नेहमी ताण-तणाव, सतत चिंता करणं आणि घाईत असणं हे शरीरासाठी घातक ठरू शकतं.