Hair Fall : केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. पण तरीही अनेकांची केसगळती काही थांबत नाही. अनेकदा हेल्दी आहार न घेतल्याने केस गळतात. त्यामुळे केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी नियमितपणे खास काळजी घ्यावी लागते. केसांसाठी खोबऱ्याचं तेल सर्वात चांगलं मानलं जातं. पण तुम्ही नारळाचं दूध केसांसाठी वापरलं का? जर वापरलं नसेल तर आम्ही तुम्हाला नारळाच्या दुधाचे केसांसाठी होणारे खास फायदे सांगणार आहोत.
नारळाचं दूध आणि केसगळती
(Image Credit : bebeautiful.in)
तसा तर नारळाच्या दुधाचा वापर अनेकदा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो. नारळाचं दूध हे एकप्रकारचं नैसर्गिक मॉइश्चरायजर आहे. कमजोर होणाऱ्या केसांना आवश्यक पोषण देण्यासाठी नारळाचं दूध अधिक फायदेशीर ठरतं. रखरखीत केस, डॅंड्रफच्या समस्या दूर करण्यासाठी नारळाचं दूध वापरलं जातं. चला जाणून घेऊ नारळाचं दूध केसांसाठी कसं वापरलं जातं?
(Image Credit : .hairbuddha.net)
- जर तुमचे केस फारच जास्त गळत असतील तर नारळाच्या दुधात थोडा कापूर मिश्रित करून पेस्ट तयार करा. नारळाच्या दुधाची आणि कापूराची पेस्ट केसांच्या मुळात लावा. काही वेळ मसाज करा आणि १ ते २ तासांनंतर केस शॅम्पूने धुवावे.
- केस अधिक रखरखीत झाले असतील तर नारळाचं दूध शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर म्हणून लावा. याने केसगळती आणि केसांची रखरखीतपणाची समस्या दूर होईल. तसेच केसांना एक खास चमकही मिळेल.
- आठवड्यातून कमीत कम दोनदा नारळाचं दूध केसांना लावा. केसांना नारळाचं दूध लावल्यावर हलक्या हाताने मसाज करा. नारळाचं दूध केसांना १ तास लावून ठेवा, त्यानंतर केस शॅम्पूने धुवावे.
- केस पांढरे होत असतील तर नारळाच्या दुधाटा वापर फायदेशीर असतो. नारळाचं दूध खोबऱ्याच्या तेलात मिश्रित करून तुम्ही केसांना लावू शकता. सकाळी आंघोळ करण्याआधी खोबऱ्याचं तेल आणि नारळाचं दूध केसांना लावा आणि शॅम्पू करा. असं केल्याने केस पांढरे होणे थांबेल.