शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

अर्धी लोकसंख्या अनफिट, व्यायाम वाटतोय नकोसा; पुरुषांच्या तुलनेत महिला कमी फिट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 7:56 AM

पुरुषांच्या तुलनेत महिला कमी फिट; आजार वाढणार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतातील नागरिकांना व्यायामचे वावडे असल्याचे समोर आले असून यामुळे देशातील निम्मी तरुण लोकसंख्या शारीरिकदृष्ट्या फिट नसल्याचे समोर आले आहे. देशातील निम्मी प्रौढ लोकसंख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या  पूर्णपणे तंदुरुस्तीचे निकष पूर्ण करत नाही. पुरुषाच्या (५७%) तुलनेत महिला (४२%) कमी फीट आहेत. लॅन्सेट हेल्थच्या अहवालानुसार, भारतीय प्रौढांमधील शारीरिक हालचाल मंदावली आहे. २००० मध्ये शारीरिक हालचाल कमी करण्याचे प्रमाण २२.३ टक्के होते ते २०२२ मध्ये ४९.४ टक्के झाले आहे. 

आजार वाढलेअहवालानुसार, शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे प्रौढांमध्ये हृदयविकार, टाइप २ मधुमेह, स्मृतिभ्रंश आणि स्तनाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो.जगभरातील जवळपास एक तृतीयांश (३१ टक्के) प्रौढांनी २०२२ मध्ये व्यायाम केला नाही.कमी शारीरिक हालचालींच्या बाबतीत भारत १९५ देशांमध्ये १२व्या क्रमांकावर आहे.

महिलांचे स्वत:वर लक्ष नाही- अहवालानुसार, भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये महिलांमध्ये कमी शारीरिक हालचाल हा चिंतेचा विषय आहे.- घरातील कामात त्यांचा जास्त सहभाग असल्याने त्यांना व्यायाम करण्यासाठी वेळ मिळत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

किमान १५० ते ३०० मिनिटे व्यायाम कराजर  शारीरिक हालचाल वाढविली नाही तर २०३० पर्यंत देशातील ६० टक्के जनता तंदुरुस्त अनफिट असेल. फिट नसल्याने आजारांची भीती वाढेल, असे अहवालात म्हटले आहे. डब्ल्यूएचओ प्रौढांसाठी दर आठवड्याला किमान १५० ते ३०० मिनिटे मध्यम एरोबिक व्यायाम करण्याची शिफारस करते.

तरुणांमधील व्यायाम करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बैठे काम वाढले आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत आहे. पर्यावरणातील बदल, वाहनांवरील वाढते अवलंबित्व आणि सतत मोबाइलला चिटकून राहिल्याने पुरेशी झोप मिळत नसल्यानेही व्यायाम करण्याकडे दुर्लक्ष होत आहे. - डॉ. रुडिगर क्रेच, आरोग्य प्रचार संचालक, डब्ल्यूएचओ

टॅग्स :Healthआरोग्य