Arthritis Disease: आपल्या शरीरात सगळ्यात महत्वाचे अवयव आहे. जर त्यांनी बरोबर काम केलं नाही तर अधु झाल्यासारखं वाटतं. कारण आपण जेवणे, पिणं, कोणतीही वस्तू उचलणं हातांनीच करतो. ऑफिस किंवा कंपनीत काम करण्यासाठीही हातांची गरज असते. त्यामुळे हात चांगले राहणं फार गरजेचं आहे. जर हातात दुखणं सुरू झालं तर आपले रोजचे काम प्रभावित होतात. हातात वेदना मांसपेशींमुळेही होऊ शकतात. हातातील मांसपेशीमध्ये वेदना सामान्य असेल तर काही हरकत नाही. पण जर हाताच्या हाडांमध्ये वेदना होत असेल तर ही स्थिती गंभीर होऊ शकते. जर तुमच्याही हाताच्या हाडांमध्ये वेदना होत असेल तर याचं कारण शोधा. कारण त्यावर वेळीच उपचार फार गरजेचा आहे.
हाताच्या हाडांमध्ये वेदना होण्याचं कारण
हातांमध्ये खूपसाऱ्या मांसपेसी, लिगामेंट्स आणि हाडे राहतात. जर यात काही समस्या झाली तर हातात वेदना होऊ लागतात आणि ही हाडे हातांमध्ये वेदनेचं कारण ठरतात. हातात जवळपास 27 हाडे असतात. जर यात इजा झाली असेल यात वेदना होते. इतर कारणांनीही हाताच्या हाडामध्ये वेदना होऊ शकते.
आर्थरायटिस
हातांच्या हाडांमध्ये होणाऱ्या वेदनेचं कारण आर्थरायटिस असू शकतं. तशी तर ही समस्या 100 पेक्षा जास्त पद्धतीची असते, पण ऑस्टियो आर्थरायटिस आणि रूमेटाइड आर्थरायटिस हातांच्या हाडांना जास्त नुकसान पोहोचवू शकते. आर्थराइटिसमुळे शरीराचे इतरही अवयव प्रभावित होतात. जर आर्थराइटिस झाला तर हाताच्या जाईंट्समध्ये सूज, वेदना आणि आखडलेपणा येतो.
कार्पल टनल सिंड्रोम
हाताच्या हाडांमध्ये होणाऱ्या वेदनेमुळे कार्पल टनल सिंड्रोम सुद्धा होऊ शकतो. कार्पल टनल हाताच्या लिगामोट आणि हाडांमधील एक जागा असते. इथे सूजही येते. या आजाराची लक्षणं हळूहळू दिसू लागतात. जसजशी वेदना वाढते, याच्या लक्षणांमध्येही वाढ होऊ लागते. अशात हाताच्या हाडांमध्ये वेदना होऊ लागते.