गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून बचाव करण्यासाठी मास्क आणि सॅनिटायजरचा शस्त्राप्रमाणे वापर केला जात आहे. दरम्यान सॅनिटायजर जास्त वापर केल्यामुळे दुष्परिणामांचा सामना करावा लागत आहे. आज आम्ही तुम्हाला सॅनिटायजर जास्त प्रमाणात वापरल्यानं कोणत्या शारीरिक समस्या उद्भवू शकतात याबाबत सांगणार आहोत. eatthis या वेबसाईडवर नमुद करण्यात आलेल्या माहितीनुसार सॅनिटायजरच्या अति वापरामुळे ८ दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो.
डर्माटायटिस, एग्जिमा
सीडिसीच्या मते, साबणाने 20 सेकंदापर्यंत हात धुवून आपण कोरोनाचा संसर्ग टाळू शकता. बाहेर असताना आपण अल्कोहोलयुक्त सॅनिटायजर वापरू शकता. परंतु त्याचा नियमित उपयोग त्वचारोग किंवा एक्झिमा अर्थात त्वचेमध्ये खाज सुटण्याची समस्या वाढवू शकतो. त्वचारोग किंवा इसबगोलमुळे त्वचेत लालसरपणा, कोरडेपणा येऊन भेगा पडतात.
फर्टिलिटी
कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉक्टर ख्रिस नॉरिस म्हणतात की काही सॅनिटायजर्स अल्कोहोलयुक्त असतात. त्यात उपस्थित इथिल अल्कोहोल एंटीसेप्टिक म्हणून कार्य करते. तर काही नॉन-अल्कोहोलिक सॅनिटायजर्स देखील आहेत. नॉन-अल्कोहोलिक सॅनिटायजर्समध्ये ट्रायक्लोसान किंवा ट्रायक्लोकार्बन सारख्या प्रतिजैविक कंपाऊंडचा वापर केला जातो. बर्याच अभ्यासांमध्ये हे सिद्ध झाले आहे की ट्रायक्लोसनचा प्रजननक्षमतेवर खूप वाईट परिणाम होतो.
हार्मोन्सवर वाईट परिणाम
एफडीएच्या मते, हार्मोनशी संबंधित समस्येस नॉन-अल्कोहोलिक सॅनिटायझर्स देखील जबाबदार असू शकतात. शरीरातील हार्मोन्सचा बिघडलेले संतुलन कोणत्याही गंभीर समस्येस चालना देऊ शकतो.
मेथानॉलमुळे नुकसान
काही सॅनिटायझर्समध्ये मिथेनॉल नावाचे एक विषारी रसायन देखील आढळते ज्यामुळे मळमळ, उलट्या, चक्कर येणे, निद्रानाश किंवा अंधत्व यांसारखे अनेक धोकादायक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. इतकेच नव्हे तर यामुळे तुमच्या मज्जासंस्थेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे एखाद्यास मारक ठरू शकते.
रोगप्रतिकारकशक्तीवर वाईट परिणाम
ट्रायक्लोझन रोगप्रतिकारक यंत्रणेच्या कार्यावर देखिल परिणाम करते. कमकुवत रोगप्रतिकारकशक्तीमुळे रोग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.
शरीराच्या वाढीसाठी नुकसानकारक
सॅनिटायजर अधिक सुगंधित करण्यासाठी, त्यात प्थालेट्स आणि पॅराबेन्स यासारख्या विषारी रसायनांचा वापर केला जातो. प्लेटलेट्स अंतःस्रावी विघटन करणारे असतात जे मानवी विकास आणि पुनरुत्पादन प्रक्रियेस प्रतिबंध करतात. पॅराबेन्स आपले हार्मोन्स, प्रजनन क्षमता आणि पुनरुत्पादक विकासासाठी हानिकारक आहेत.
चिंताजनक! कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या ताण-तणावात वाढ; तज्ज्ञांनी सांगितली 'ही' कारणं...
अल्कोहोल पॉईजनिंग
सॅनिटायझर अधिक प्रभावी करण्यासाठी, त्यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण वाढविले जाते. परंतु जगात अशी अनेक प्रकरणे आढळली आहेत, ज्यात किशोरवयीन मुलांना सॅनिटायझरमुळे अल्कोहोल विषबाधा झाल्या आहेत. दारूच्या विषबाधा नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले.
चिंताजनक! फायझरच्या लसीचे साईड इफेक्ट दिसल्यानंतर CDC नं दिला सावधगिरीचा इशारा
त्वचेशी निगडीत समस्या
हँड सॅनिटायझर एक एंटीसेप्टिक उत्पादन आहे. याचा उपयोग त्वचेच्या जंतुपासून संरक्षण करण्यासाठी केला जातो. हे इथिनॉल किंवा आयसोप्रोपिल अल्कोहोलसारख्या घटकांच्या मदतीने तयार केले जाते. कदाचित आपल्याला हे ठाऊक नसेल पण याच्या सततच्या वापरल्यामुळे त्वचेत कोरडेपणाची समस्या वाढू शकते. जर तुमची त्वचा अत्यंत संवेदनशील असेल तर तुम्ही सॅनिटायजरच्या वापराबाबत खूप सावध असणे आवश्यक आहे.