शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

हातावरील किटाणू मारण्यासाठी सॅनिटायजर निकामी, एक्सपर्ट्स सांगतात हात धुण्यासाठी वापरा 'हा' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 11:01 AM

सॅनिटायजरने हात स्वच्छ केल्यावर त्यांचे हात पूर्णपणे स्वच्छ होतात किंवा त्यांना संक्रमणाचा धोका राहत नाही. मात्र, हा समज चुकीचा आहे.

हात स्वच्छ करण्यासाठी किंवा हातावरील बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी अलिकडे सॅनिटायजरचा अधिक वापर केला जातो. लोकांना वाटतं की, सॅनिटायजरने हात स्वच्छ केल्यावर त्यांचे हात पूर्णपणे स्वच्छ होतात किंवा त्यांना संक्रमणाचा धोका राहत नाही. मात्र, हा समज चुकीचा आहे. तुम्हाला जर संक्रमणापासून बचाव करायचा असेल तर सॅनिटायजरसोबत साबणाने हात धुवावे. जपानमधील वैज्ञानिकांनी सॅनिटायजरच्या वापरासोबतच साबणाने हात धुण्याचा सल्ला दिला आहे. 

जपानमधील क्योटो युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या रिसर्चनुसार, जपानी वैज्ञानिकांनी अ‍ॅंटी-सेप्टीक साबणाने हात धुण्याचा सल्ला दिला आहे. सॅनिटायजर स्कीनमध्ये शोषूण घेतल्यावर २ मिनिटांनंतरही फ्लू चे व्हायरस जिवंत राहतात. अल्कोहोलपासून तयार सॅनिटायजर खासकरून व्हायरस नष्ट करण्यात असफल ठरतात.

बदलतोय फ्लूचा व्हायरस

वैज्ञानिकांनुसार, जेव्हा व्हायरस एखाद्या लिक्विडमुळे पसरतो तेव्हा सॅनिटायजर योग्य प्रकारे काम करत नाही. जसे की, शिंका आल्यावर. सॅनिटायजर लावल्यानंतरही काही मिनिटे व्हायरस जिवंत राहतो. सॅनिटायजर किती काम करतं हे जाणून घेण्यासाठी फ्लूने संक्रमित म्यूकस(चिकट पदार्थ) हातावर ठेवण्यात आला. त्यानंतर सॅनिटायजर लावण्यात आळं आणि ४ मिनिटे हात त्याने पुसण्यात आले.

वैज्ञानिकांनी सल्ला दिला आहे की, अशा स्थितीत हात गरम पाणी आणि अ‍ॅंटी-बायोटिक साबणाने धुणे जास्त चांगलं असतं. असं केल्याने ३० सेकंदाच्या आतच  व्हायरसला नष्ट केलं जाऊ शकतं. रिसर्चचे निष्कर्ष यासाठी समजून घेणं गरजेचं आहे. कारण दरवर्षी अडीच ते ५ लाख मृत्यू फ्लूच्या व्हायरसमुळे होत आहेत. दरवर्षी फ्लू चा व्हायरस नव्या रूपात समोर येत आहे आणि याने मृत्यूचं प्रमाण वाढत आहे.

वैज्ञानिकांचं मत आहे की, जास्तीत जास्त हॅंड सॅनिटायजरमध्ये अल्कोहोलचा वापर केला जातो. काहींमध्ये अ‍ॅंटी-बायोटिक तत्व असतात, जे बॅक्टेरियाला तर नष्ट करतात. पण इन्फ्लूएंजाच्या व्हायरसला नष्ट करण्यात अपयशी ठरतात. वैज्ञानिकांनी फ्लू ने संक्रमित अनेक सॅंम्पल घेऊन रिसर्च केला. त्यांना आढळलं की, व्हायरस नष्ट करण्यासाठी अल्कोहोल कमी फायदेशीर ठरतं. फ्लू व्हायरसची लागण एकापासून दुसऱ्याला व्यक्तीला सहजपणे होऊ शकते. अशात खोकलताना किंवा शिंकताना तोंडावर कपडा लावणे गरजेचं ठरतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सJapanजपान