मिस्टर कूल अशी ओळख असणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज 38वा वाढदिवस. खरं तर या वयातही धोनी आपल्या फिटनेसने भल्या भल्यांना मागे टाकतो. एका सामान्य कुटुंबातून आलेला धोनीचा आज जगभरातील नावाजलेल्या क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये समावेश होतो. एवढचं नाही तर धोनीच्या कॅप्टनसीच्या चर्चाही नेहमी होत असतातच.
आज धोनीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या या फिटनेसचा आणि कोणत्याही कठिण परिस्थितीत कूल राहण्याचं गुपित नक्की काय आहे?
वर्कआउट मस्ट
क्रिकेटचा सामना असो किंवा नसो, ऑफ डेजमध्येही धोनी वर्कआउट करायला विसरत नाही. वर्कआउटमध्ये धोनीचं संघासोबतच 4 तासाचं प्रॅक्टिस सेशनही असतं. यामध्ये प्रामुख्याने रनिंगचाही समावेश असतो. याचसोबतच धोनी घरीही एक्सरसाइजसाठी वेळ देतो. जिममध्ये धोनी वी ग्रिप पुल डाउन, लेटरल पुल डाउन, डंबल चेस्ट प्रेस, डम्बल रोइंग, डम्बल लंजेस, वन लेग डेडलिफ्ट, रिवर्स लंग्स, मशीन चेस्ट प्रेस अशा सेशन्समध्ये वर्कआउट करतो.
फुटबॉलमुळे स्टॅमिना आणि बॅडमिंटनमुळे व्हिजन राहतं उत्तम
धोनी क्रिकेट खेळण्यासोबतच बॅडमिंटन आणि फुटबॉलही खेळतो. त्याच्या पर्सनल ट्रेनरने एका इंटरव्यूमध्ये बोलताना सांगितले होते की, धोनीला फक्त क्रिकेटच नाही तर इतरही खेळ आवडतात. त्यामुळे धोनी एकदम फिट अन् फाइन असतो. दोनी प्रामुख्याने फुटबॉल आणि बडमिंटन खेळल्याने डोळे हेल्दी राहतात. यामुळे धोनी उत्तम विकेटकिपर आहे.
हेल्दी डाएट घेतो
धोनी आपल्या डाएटकडे उत्तम लक्ष ठेवतो. धोनी आपल्या डाएटमध्ये नेहमी एक रूल फॉलो करतो. धोनी शरीराला आवश्यक आहे तेवढ्याच कॅलरी घेतो. तो भारतीय भोजन म्हणजेच, डाळ, तांदूळ, भाजी-चपाती खाणं पसंत करतात. तसेच खाण्यामध्ये तो हाय-फॅट्स आणि कमी शिजवलेले पदार्थ खाणं पसंत करतो. याव्यतिरिक्त फळं, सलाड, नट्स आणि ड्रायफ्रुट्स यांचाही समावेश करतो.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं.