दिवसाला करा हॅप्पी हॅप्पी...!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2016 6:35 PM
रोजच्या धकाकीच्या जीवनात प्रत्येक मनुष्याचे स्वत:कडे दुर्लक्ष होत चालले आहे. यामुळेच शारीरिक व्याधींमध्ये वाढ होत असते
रोजच्या धकाकीच्या जीवनात प्रत्येक मनुष्याचे स्वत:कडे दुर्लक्ष होत चालले आहे. यामुळेच शारीरिक व्याधींमध्ये वाढ होत असते. त्यात बऱ्याचदा चिडचिड, थकवा, मरगळ, नैराश्य आदी समस्या जाणवू लागतात. आनंदी जगण्याऐवजी रोज त्रस्त जीवन जगू लागतो. मात्र रोजच्या दैनंदिनीत थोडा बदल केल्यास आपण प्रत्येक दिवस हॅप्पी हॅप्पी जगू शकतो. एका संशोधनानुसार जेव्हाही आपण तणावात किंवा रागात असाल त्यावेळी मेंदूमध्ये अॅड्रीनलिन आणि कॉर्टिसोल हार्मोन तयार होते. यामुळे संपूर्ण शरीरावर अशा प्रकारे परिणाम होतो, जसा की औषध घेतल्यानंतर शरीरात होतो, धूम्रपान करणे किंवा शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळेही तणाव येतो. याचा उपाय तुमच्या आहारात लपलेला आहे, जाणून घ्या तो कसा ?ज्यावेळी शरीर तणावात असते, त्यावेळी त्याला अतिरिक्त उर्जेची गरज असते. त्यावेळी शरीराला काबोहायड्रेट्ची आवश्यकता असते. कारण, हे शरीरात हळूहळू श्रवते. यामुळे रक्तामध्ये साखरेचे प्रमाण स्थिर राहते आणि इंन्सूलिनचे प्रमाण वेगाने वाढत नाही.सोयाबीन आणि मसूरमध्ये विटामिन बी (६) भरपूर प्रमाणात असते. हे नर्वस सिस्टम आणि इम्यून सिस्टमला चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी मदत करते. तसेच लाल रक्त पेशींना तयार करण्यात मदत करते.दररोज एक कप कॉफी पिणे आरोग्यासाठी लाभदायक असते. त्यासोबत कॅफिनच्या हानिकारक परिणामांकडेही लक्ष असू द्या. जर ते शरीरात जास्त प्रमाणात गेले तर शरीर खनिज तत्व शोषून घेत नाही.