सध्या डिम लाइट्सची फॅशन आहे. हॉटेल किंवा रेस्टॉरंन्ट्समध्ये एवढचं नाही तर काही लोक घराघरांमध्येही डिम लाइट्स लावतात. डिम लाइट्सना रिलॅक्सिंग मानलं जातं. त्यांच्यामुळे तयार होणारं वातावरणं अल्हाददायी आणि शांत असतं, असं सांगितलं जातं. त्यामुळे अनेक मोठे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स डिम लाइट्सना प्राधान्य देतात. पण तुम्हाला माहीत आहे का? डीम लाइटमध्ये काम केल्याने किंवा वाचन केल्याने आपल्या शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
डोकेदुखी आणि डोळ्यांना होणाऱ्या वेदना
लहानपणी आपण डीम लाइटमध्ये पुस्तक घेऊन वाचायला बसलो की, मोठी माणसं ओरडायला सुरुवात करायची. त्यावेळी आपण त्यांच्य बोलण्याकडे दुर्लक्षं करायचो, पण ते आपल्याला खरं सांगायचे. कमी लाइटमध्ये वाचण्याचं काम केल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. त्यामुळे डोळ्यांमध्ये वेदना जाणवू लागतातच, पण डोळ्यांच्या दृष्टीवरही परिणाम होतो. यामुळे डोकेदुखीच्या त्रासाचाही सामना करावा लागतो.
नेक, बॅक आणि शोल्डर पेन
डिम लाइटमुळे वस्तू किंवा शब्द स्पष्ट दिसावे म्हणून आपण स्क्रिनच्या दिशेने जास्त झुकतो. या पोझिशनमध्ये जास्त वेळ बसून राहिल्याने मानेपासून पाठ आणि खांदे दुखू लागतात. जर ही स्थिती बराच वेळ तशीच राहिली तर पाठिशी निगडीत समस्या वाढू शकतात आणि तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
एकाग्रतेमध्ये व्यत्यय
शरीराला होणाऱ्या समस्यांमुळे व्यक्तीला कामावर कॉन्सट्रेट करणं अवघड होतं. त्याच्या मनात येणारे विचार किंवा वाचण्याच्या क्षमतेवर शारीरिक समस्यांचा परिणाम होतो.
डिप्रेशन
जास्त लो लाइटमध्ये राहिल्यामुळे डिप्रेशनचा धोका वाढतो. आपण अनेकदा पाहतो की, डिप्रेशनने पीडित असणाऱ्या व्यक्तीला जास्त लाइट सहन होत नाही. त्यांना अंधार किंवा कमी लाइटमध्येच राहायला आवडतं. त्यामुळे डिप्रेशन आणखी वाढतं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.