Cholesterol : अनेकांसाठी कोलेस्ट्रॉल हा शब्द धडकी भरवणारा असतो. कारण जर शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं तर हार्ट अटॅकचा धोका वाढतो. कोलेस्ट्रॉल हा एक मेणासारखा पदार्थ असतो जो शरीरात वाढला तर रक्तवाहिन्या ब्लॉक होतात ज्यामुळे रक्त पुरवठा योग्यपणे होत नाही. तसं पाहिलं तर कोलेस्ट्रॉल शरीरासाठी महत्वाचं असतं. जसे की, हार्मोन रिलीजसोबतच मेटाबॉलिज्म बूस्ट करणे, बाइल अॅसिड तयार करणे ही कामे कोलेस्ट्रॉलच्या मदतीने होतात. पण जर बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर समस्या होते.
कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असतात. एक गुड कोलेस्ट्रॉल आणि एक बॅड कोलेस्ट्रॉल. गूड कोलेस्ट्रॉल शरीरासाठी महत्वाचं असतं. तर बॅड कोलेस्ट्रॉलमुळे शरीराचं नुकसान होतं. पण जर बॅड कोलेस्ट्रॉल शरीरात वाढलं तर वेगवेगळे आजार होतात.
कोलेस्ट्रॉल कमी कसं कराल?
हाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी वेगवेगळी औषधं मिळतात. पण आहारात काही गोष्टींचा समावेश केला तर तुम्ही कोलेस्ट्रॉल कमी करू शकता. यासाठी तुम्ही आहारात कशाचा समावेश कराल हे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
मिक्स्ड नट्स
Harvard Health नुसार जर तुमची कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढली असेल तर मिक्स्ड नट्सचं सेवन नियमित करायला हवं. यात अनसॅच्युरेटेड फॅट, फायबर आणि प्लांट स्टेरोल्सचं प्रमाण जास्त असतं. यांनी कोलेस्ट्रॉल लेव्हल योग्य राहते.
ताजी फळं
सफरचंद, संत्री, जांभळं आणि केळी खाऊन तुम्ही कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवू शकता. यात सॅच्युरेटेड फॅट कमी आणि फायबर व अॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असतात. ताजी फळं हृदयासाठी खूप फायदेशीर असतात. फळांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल लेव्हलही कमी होते.
धान्याचे बिस्कीट
कडधान्याच्या बिस्कीटांमध्ये फायबर भरपूर असतं. तर एवोकाडोमध्ये मोनोअनसॅचुरेटेड फॅट असतं. बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यात याची महत्वाची भूमिका असते.
जांभळासोबत ग्रीक योगर्ट
ग्रीक योगर्टमध्ये प्रोबायोटिक्स भरपूर असतात. याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. हाय कोलेस्ट्रॉल असलेले लोक ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी किंवा जांभळं खाऊ शकता. यात अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि फायबर भरपूर असतं. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढत नाही.
पॉपकॉर्न
जर तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर तुम्ही पॉपकॉर्न खाऊ शकता. यात सॅच्युरेटेड फॅट आणि कॅलरी कमी असतात. जर पॉपकॉर्न एअर पॉपिंग करून बनवले तर याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत मिळते.