अंकिसा परिसरातील हिरवीगार मक्याची शेती : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा, आसरअल्ली परिसरात हजारो हेक्टरवर मक्याचे उत्पादन घेतले जाते. गोदावरीच्या काठावरील जमीन सुपीक असल्याने मक्याचे पिकही जोमात येते. यावर्षी या मक्याचे पीक अतिशय चांगले आहे. सदर पीक या परिसरातून ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. गोदावरी नदीवर सिरोंचानजीक पूल झाल्याने येथील शेतकऱ्यांना तेलंगणा राज्यातील बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मक्याला चांगला भाव मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
अंकिसा परिसरातील हिरवीगार मक्याची शेती :
By admin | Published: January 28, 2017 1:22 AM