झेंडूच्या फुलांचा वापर मंदिरामध्ये पूजेसाठी आणि घर सजवण्यासाठी केला जातो. या फुलांचा सुगंध खूप छान असतो.तुम्ही कधी झेंडूच्या फुलांचा चहा प्यायला आहे का? झेंडूच्या फुलांचा चहा म्हटल्यावर तुम्हाला वाटेल असला चहा असतो का कधी. पण खरंच झेंडूच्या फुलांचा चहा असतो आणि हा चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला झेंडूच्या फुलाचा चहा कसा तयार करायचा आणि त्याचे फायदे सांगणार आहोत. असा तयार करा झेंडूच्या फुलांचा चहा झेंडूच्या फुलांचा चहा तयार करण्यासाठी दोन ग्लास पाणी घ्या. भांड्यामध्ये हे पाणी टाकून ते गॅसवर ठेवा. पाणी उकळत असताना त्यामध्ये झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाका. कमीत कमी पाच मिनिटं त्यावर झाकण ठेवा. गॅस बारीक करुन पाणी चांगले उकळू द्या. झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांचा रंग पाण्यामध्ये उतरलेला दिसेल. हे पाणी तोपर्यंत उकळा जोपर्यंत ते अर्धे होत नाही. गॅस बंद करा आणि या पाण्यामध्ये मध मिसळा. अशाप्रकारे झेंडूच्या फुलांचा चहा तयार झाला असून तो तुम्ही पिऊ शकता.
झेंडूच्या फुलांच्या चहाचे फायदे झेंडूच्या फुलांमध्ये अँटी-ऑक्सिडेंट गुण असतात. ज्यामुळे आपला तणाव कमी होण्यास मदत होते. झेंडूच्या फुलांचा चहा प्यायल्यामुळे अंगाला येणारी सूज, चरबी आणि डायबिटीस कंट्रोल केले जाऊ शकते.झेंडूच्या फुलांचा चहा प्यायल्यामुळे दात दुखीची समस्या दूर होते. यासाठी झेंडूचा चहा थोडासा थंड करा आणि त्याने गुळण्या करा.झेंडूच्या फुलांचा चहा प्यायल्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होतात. चेहऱ्यावर मुरुम आणि पुरळ येण्याच्या समस्यांपासून सुटका होते.