भात (Rice) हे अन्न नसून भावना आहे असे मीम्स सोशल मिडीयावर आपण पाहिलेच असतील. कोकणी माणसांच तर जेवण भाताशिवाय अपूर्ण आहे. तांदळाचे अनेक पदार्थही तुमच्या जिभेचे चोचले पुरवत असतील. पण मित्रांनो तुम्ही पांढरे तांदूळ खात असाल. तुम्ही काळे तांदूळ (Black Rice) पाहिले आहेत का? तुमचा विश्वास बसणार नाही पण काळ्या तांदळाची शेती आपल्या देशातही केली जाते. ती मोठ्या प्रमाणावर होत नाही. हे तांदूळ तुम्हाला दूकानात मिळणार नाहीत पण ऑनलाईन ग्रोसरी स्टोर्सवर हे काळे तांदुळ तुम्हाला मिळतील. आज आपण काळ्या तांदळाचे गुणधर्म, फायदे, इतिहास सर्व जाणून घेणार आहोत.
काळ्या तांदळाचा इतिहासकाळ्या तांदळाची शेती चीनमध्ये फार पूर्वी केला जायची. त्याकाळात तिथे फक्त राजे महाराजेच काळ्या तांदळाचा भात खायचे. आता चीनमध्ये सर्वसामान्य माणसंही काळ्या तांदळाचा भात खातात.
अँटीऑक्सिडंट्स चा समावेशकाळा तांदुळ, सफेद तांदळाच्या तुलनेत बऱ्याच प्रमाणात गुणकारी आहे. यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आपले शरीर आतून स्वच्छ ठेवतात.
अँथसायनिन ठेवते हृदयाचे स्वास्थ्य निरोगीकाळ्या तांदळामध्ये अँथसायनिन असते. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते. यामुळे हृदयासंबधीच्या अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत होते. हृदयरोगाचा धोका मोठ्याप्रमाणात कमी होतो. त्याचप्रमाणे या घटकामुळे रक्तातील शर्कराही योग्य प्रमाणात राहते.
वजन घटवतेसफेद तांदळाच्या तुलनेत काळ्या तांदळात फॅट्स कमी असतात. त्यामुळे वजन कमी होते.
यकृत (liver)साठी उपयुक्तकाळे तांदूळ लीवरचे कार्य उत्तम ठेवतात. या तांदळामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे लीवर डिटॉक्स होण्यास मदत होते.
पचनशक्ती उत्तम राखतेकाळ्या तांदळात फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील अन्नाचे व्यवस्थित पचन होते.