Headaches associated with sex : अनेकदा लोकांना वाटतं की, महिला शारीरिक संबंध (Sex Life) टाळण्यासाठी डोकेदुखीचं (Headaches) कारण बनवतात. यावरून अनेकप्रकारचे जोक्सही बनवले जातात. मात्र,एक्सपर्टनुसार सेक्ससंबंधी डोकेदुखी काही गंमतीची गोष्ट नाही. लोयोला यूनिव्हर्सिटी शिकागो स्ट्रिच स्कूल ऑफ मेडिसीनच्या न्यूरोलॉजी विभागाचे एमडी जोस बिलर यांनी न्यूरोलॉजी लाइव्हला दिलेल्या मुलाखतीत महत्वाची माहिती दिली.
प्राध्यापक बिलर म्हणाले की, 'सेक्शुअल अॅक्टिविटी दरम्यान अनेकांना डोकेदुखी जाणवते. पण हे लोक डॉक्टर्ससोबत यावर बोलताना लाजतात आणि डॉक्टर्सही याबाबत सांगत नाहीत. सेक्शुअल अॅक्टिविटीसंबंधित डोकेदुखी हलक्यापासून ते जोरात होऊ शकते. हे फारच वेदनादायी आणि गंभीर असू शकतं. ही डोकेदुखी होणाऱ्यासोबतच त्यांच्या पार्टनरसाठीही निराशाजनक होऊ शकते'.
प्राध्यापक बिलर म्हणाले की, जवळपास १ टक्के लोकांना सेक्शुअल अॅक्टिविटी दरम्यान जोरात डोकेदुखीची तक्रार होत असते. अशाप्रकारची डोकेदुखी फार वेदनादायी असते. डोकेदुखी सामान्यपणे मायग्रेन किंवा तणावामुळे होते. लैंगिक संबंधाविषयी डोकेदुखी सामान्यच असते. पण एक्सपर्ट सांगतात की, अशाप्रकारची डोकेदुखी अनेकदा जीवघेणी होऊ शकते. भलेही अशाप्रकारच्या केसेस कमी असेल पण ब्रेन हॅमरेज, स्ट्रोक सर्वाइकल आर्टरी डिसेक्शन किंवा मग सबड्यूरल हेमेटोमामुळेही हे डोकेदुखी असू शकते. प्राध्यापक बिलर म्हणाले की, 'आम्ही रूग्णाना पूर्णपणे न्यूरोलॉजिकल टेस्ट करण्याचा सल्ला देतो. जेणेकरून याचं खरं कारण जाणून घेता येईल'.
सेक्ससंबंधी डोकेदुखी
इंटरनॅशनल हेडेक सोसायटीने सेक्शुअल अॅक्टिविटीशी संबंधित डोकेदुखीला ३ भागांमध्ये विभागलं आहे. एका दुखणं जे डोकं आणि मानेत उत्तेजनेआधी सुरू होतं आणि उत्तेजना वाढल्यावर आणखी दुखणं वाढतं. दुसऱ्या प्रकारची डोकेदुखी फार त्रासदायक आहे जी इंटरकोर्स दरम्यान सुरू होतो आणि अनेक तासांपर्यंत राहतं. अशाप्रकारची डोकेदुखी अचानक होते आणि यात डोक्याच्या मागच्या भागात जास्त वेदना होते. तेच तिसऱ्या प्रकारची डोकेदुखी सेक्सनंतर जावणते. यालाही हलक्यात घेणं नुकसानकारक ठरू शकतं. याप्रकारची डोकेदुखी उभे झाल्यावर जास्त जाणवते. आणि पाठीवर झोपल्याने कमी होते.
प्राध्यापक बिलर यांच्यानुसार, 'पुरूषांना महिलांच्या तुलनेत सेक्ससंबंधी डोकेदुखी होण्याची शक्यता ३ ते ४ पटीने जास्त असते. डोकेदुखी कशाप्रकारची आहे, या आधारवर औषधं घेतली जाऊ शकतात. त्यासोबतच डॉक्टर्स दररोज एक्सरसाइज करणे आणि वजन नियंत्रित ठेवण्याचा सल्ला देतात. त्यासोबतच मद्यसेवन आणि स्मोकिंगचं प्रमाण खूप कमी करण्याचा सल्ला देतात'.