Health Alert : दुधासोबत ‘हे’ पदार्थ कदापी सेवन करु नये, आरोग्यासाठी ठरतील घातक !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2017 7:05 AM
से काही पदार्थ जे दुधासोबत सेवन करणे वर्ज्य आहे. त्यांच्या सेवनाने आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. जाणून घेऊया त्या पदार्थांविषयी...
सुदृढ राहण्यासाठी बऱ्याचदा डॉक्टरांकडून दूध सेवन करावे, असा सल्ला दिला जातो. कारण दुधाला संपूर्ण आहार म्हटले जाते. मात्र असे काही पदार्थ जे दुधासोबत सेवन करणे वर्ज्य आहे. त्यांच्या सेवनाने आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. जाणून घेऊया त्या पदार्थांविषयी...* दूध आणि मांसाहारदूध आणि मांसाहारामध्ये बऱ्याचप्रमाणात विटॅमिन्स आणि प्रोटीन्स मिळतात. मात्र हे दोन्ही पदार्थ एकत्र घेतल्यास शरीरात पोषक तत्त्वांचे प्रमाण जास्त होते. ज्याकारणाने आपल्या शरीरात खूपच नुकसान होऊ शकते. * दूध आणि मीठ दुधासोबत मीठाचे सेवन अजिबात करु नये. दुधासोबत मीठाचे सेवन केल्यास याचा दुष्परिणाम लगेच नाही पण काही वर्षानंतर आरोग्यावर दिसू लागतात. असे सेवन केल्यास पांढरा रोग होण्याची शक्यता जास्त असते. * दुध आणि मासेडोळे, त्वचा आणि केसांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी मासे सेवन केले जातात. मात्र जर मासे दुधासोबत सेवन केले तर पोटात विषारी पदार्थ तयार होतात. ज्यामुळे पोटात दुखणे शिवाय ह्रदयासंबंधी तक्रारीदेखील वाढतील. * दूध आणि आंबट फळआपणास आंबट फळांचे सेवन केल्याचे फायदे माहितच आहेत. मात्र या आंबट फळांचे सेवन दुधासोबत केल्यास फायद्याऐवजी नुकसानच जास्त होते. यामुळे आपणास सर्दी, खोकला तसेच बऱ्याच प्रकारच्या अॅलर्जींचा सामना करावा लागतो.Also Read : Health Alert : सावधान, दूधासोबत चुकूनही करु नका ‘या’ पदार्थांचे सेवन ! : Health : दुधात साखर ऐवजी गूळ करा मिक्स, होणार सुदृढ !