शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
2
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
3
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
5
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
6
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
7
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
8
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
9
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
10
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
11
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
12
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
13
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

Health Alert : ​त्वचेवर 'ही' लक्षणे आढळल्यास समजावा आहे "लैंगिक आजार" !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2017 7:47 AM

आपल्या शरीरावरील त्वचेवर पुळ्या येणे, खाज सुटणे, त्वचा लाल होणे आदी लक्षणे सहज घेऊ नका, असू शकतो लैंगिक आजार. सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा...

-Ravindra Moreलैंगिक आजाराविषयी आपण फक्त ऐकत असतो, मात्र याविषयी आपणास सर्व माहिती असणे आवश्यक आहे. लैंगिक आजारांनाच सेक्शूली ट्रान्समिटेड डिसिस म्हणजेच एसटीडी म्हटले जाते. लैंगिक आजारामध्ये विशेषत: कोणतेही लक्षण लगेच दिसून येत नाही. हा विकार वाढल्यावर त्याची लक्षणे दिसू लागतात. एसटीडी मध्ये निरनिराळे प्रकार आहेत. हे आजार संक्रमित व्यक्तीसोबत सेक्स संबंध आल्यास पसरतात. या विकारांचे संक्रमण झाल्यास त्या व्यक्तीच्या त्वचेमध्ये देखील अनेक बदल दिसून येतात. आज आम्ही अशीच काही लक्षणांची माहिती देत आहोत जे लैंगिक आजारांमध्ये त्वचेवर आढळतात.* फोड अथवा जखम होणेHerpes virus infection  अथवा नागीण हा आजार असल्यास जननेंद्रिये व गुद्दवाराच्या मुखाकडील भागावर छोटे पाणीदार फोड येतात. हे फोड खूप संवेदनशील असून लगेच फुटू शकतात. ओठांवर देखील लहान फोड येणे हे Herpes virus infection चे एक लक्षण आहे. जननेंद्रिय, गुदाशय, तोंड अथवा ओठ अशा इनफेक्शन झालेल्या भागाला वेदनारहित छोटे फोड येणे ‘सिफलीस’ या विकाराचे एक प्रमुख लक्षण आहे. दहा दिवसांनंतर हे फोड लालसर झाल्यास व शरीरावर पेनी-साईज रॅशेस आल्यास हे सिफलीस या विकाराचे दुसऱ्या टप्यातील लक्षण असू शकते.गुप्तांगाला वेदना व फोड हे Chancroid चे लक्षण आहे. एका दिवसामध्ये त्याचे रुपांतर पिवळसर राखाडी रंगाच्या अल्सरमध्ये होते.* त्वचा लालसर होणे व खाज येणेलैंगिक आजारादरम्यान येणाऱ्या बुरशीमुळे त्वचा लालसर होते व मांड्यांजवळच्या भागावर खाज सुटते. तसेच यीस्ट संक्रमणामध्येही व्हरजायनामध्ये आणि पेनिसमध्ये खाज येते. शिवाय खरुज (Scabies) झाल्यास रात्रीच्या वेळी अधिक खाज येते. ट्रायकोमोनास या परजीवी इनफेक्शन मध्ये देखील गुप्तांगाला खाज, जळजळ, लालसरपणा व वेदना होतात. ‘सिफलीस’ या विकाराच्या दुसऱ्या टप्प्यात योनीमार्ग व गुद्दवाराच्या मुखाच्या भागाला लाल किंवा तपकिरी रॅशेस येतात. त्याचप्रमाणे हे रॅशेस हात व पायाच्या तळव्यांना देखील येतात. नागिण मध्ये देखील प्रथम त्वचेला दाह होतो व मुंग्या येतात. * त्वचा व डोळे पिवळसर होणेहिपॅटायटीस इनफेक्शन झाल्यास त्वचा व डोळे पिवळसर होतात. * अल्सरअल्सर दोन प्रकारचा असून पहिला जेनीटल अल्सर वेदना रहित असतो ज्यात मांड्याच्या सांध्या कडील भागात Granuloma inguinale येतात. तर दुसरा अल्सर वेदनायुक्त असून Chancroid मध्ये असतो.* चामखीळ अथवा Wartsसंक्रमण झालेल्या त्वचेचा जवळून संबध आल्यास एचपीव्ही विकार होतो ज्यामुळे जनेनद्रियांना चामखीळे अथवा Warts येतात.या संक्रमणामुळे जनेनद्रिंयाला लहानलहान त्वचेच्या रंगाचे चामखीळ अथवा काळपट सूज येते. या विकाराच्या संक्रमित व्यक्तीसह ओरल सेक्स केल्यास त्यामुळे तोंड अथवा घश्यामध्ये देखील हे संक्रमण होते. काही जणांमध्ये या चामखीळांचा आकार मोठा असू शकतो.* लहान पुळ्या येणेMolluscum contagiosum अथवा नागीण इनफेक्शन मध्ये देखील जननेद्रिंयावर लहान लहान पुळ्या येतात.  शिवाय Herpes  infection मध्ये त्वचेवर अगदी लहान आकाराच्या पुळ्या येतात.