HEALTH : आपणही अॅसिडिटीने त्रस्त आहात?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2017 9:36 AM
बदलती जीवनशैली, अवेळी जेवण, धावपड, ताणतणाव अशा विविध कारणांनी प्रत्येकाला कधीतरी अॅसिडिटीचा त्रास होतोच.
बदलती जीवनशैली, अवेळी जेवण, धावपड, ताणतणाव अशा विविध कारणांनी प्रत्येकाला कधीतरी अॅसिडिटीचा त्रास होतोच. काहीजण या त्रासाकडे दुर्लक्ष करतात आणि डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार घेत नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यापूर्वीच काही महिने ते घरच्या घरीच अॅसिडिटीवर उपाय करतात. कुणी काही उपचार सांगितला की तो करून पाहणं, मेडिकलच्या दुकानात जाऊन स्वत:च अॅसिडिटीवर औषध मागून घेणं असा प्रकार सुरू होतो. काहीजण अॅसिडिटीची भावना कमी करायला भरपूर पाणी पितात किंवा गार दूध पितात, तर काही लोक हा विकार बळावला की मध किंवा आईस्क्रीम खातात. पण योग्य वैद्यकीय सल्ला घेणं या लोकांना महत्त्वाचं वाटत नाही.अॅसिडिटीकडे वेळीच लक्ष दिले नाही तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यात वजन कमी होण्यास मोठी भूमिका अॅसिडिटीची आहे. यासाठी मात्र चालणे, सायकल चालवणे व पोहणे आदी व्यायाम केल्यास अॅसिडिटी दूर होण्यास मदत होते. शिवाय अॅसिडिटी होऊ नये म्हणून पोटावर कोणताही ताण निर्माण करणारे व्यायाम टाळावेत. प्रशिक्षित तज्ज्ञांच्या मदतीने वजन कमी करणे आवश्यक आहे. काही ठरावीक योगासने आरोग्यासाठी उत्तम असतात. कमी जेवण करणे हादेखील चांगला पर्याय असून बऱ्याचदा डॉक्टर हा सल्ला देतात.